22 March 2018

News Flash

पुन्हा मुख्यमंत्रीच लक्ष्य; भाजपची कोंडी

हिंसाचारानंतर हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याने भाजपची अधिक कोंडी होणार आहे.

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 3, 2018 3:35 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामाजिक वातावरण तापविण्याचे प्रयत्न

भीमा कोरेगावच्या माध्यमातून मराठा विरुद्ध दलित अशी सामाजिक दरी वाढविण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न झाले असून, मराठा मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले आहे. हिंसाचारानंतर हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याने भाजपची अधिक कोंडी होणार आहे.

भीमा कोरेगावच्या २००व्या स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनावरूनच वाद निर्माण झाला होता. काही संघटनांनी या कार्यक्रमाला विरोधही केला होता. तेव्हाच सरकारी यंत्रणेने खबरदारी घेणे आवश्यक होते. पण कालच्या घटनेनंतर पोलीस यंत्रणा कमी पडल्याचे वास्तव समोर आले. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या माध्यमातून मराठा समाज विरुद्ध दलित समाजातील दरी वाढविण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला आहे. ग्रामीण भागांमध्ये अजूनही काही गावांमध्ये या दोन समाजात तेवढा एकोपा नसतो. भीमा कोरेगावच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमानंतर उसळलेल्या हिंसाचारानंतर दोन समाजातील तेढ वाढली आहे.

मराठा मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना पद्धतशीरपणे लक्ष्य करण्यात आले होते. शेजारील गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणानंतर तेथील सामाजिक परिस्थिती बदलली. शेवटी सत्ताधारी भाजपला मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना बदलावे लागले होते. पटेल समाजाच्या नाराजीचा भाजपला गुजरात निवडणुकीत फटका बसला. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची कोंडी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. अर्थात, मराठा समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे इतर मागासवर्गीय आणि दलित समाजाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला साथ दिली होती. मराठा आरक्षणाला होणाऱ्या विलंबास फडणवीस हे जबाबदार असल्याचे खापर फोडले जाते. आता दलित समाजात भाजपबद्दल प्रतिकूल मत तयार करण्याचा प्रयत्न  सुरू झाला आहे. हिंदुत्ववादी नेत्यांनी पूर्वनियोजितपणे हा हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप विरोधी नेत्यांनी केला आहे. तसा प्रचार होणे भाजपसाठी त्रासदायक ठरू शकते. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी हिंसाचारास जबाबदार धरलेल्या भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे या हिंदुत्ववादी नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याने भाजपची अधिकच पंचाईत झाली.

पटेल समाजाच्या नाराजीचा भाजपला गुजरातमध्ये फटका बसला. यामुळेच महाराष्ट्रात मराठा समाजाच्या नाराजीचा किती परिणाम होऊ शकतो याचा अंदाज भाजपकडून घेण्यात येत आहे.

दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा काही प्रवृत्तींचा डाव आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेला मानणाऱ्या सर्वानी एकत्र येऊन हा कुटिल डाव हाणून पाडावा.

अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

First Published on January 3, 2018 3:35 am

Web Title: bhima koregaon violence dalit maratha clashes
 1. U
  uspadhye
  Jan 3, 2018 at 5:51 pm
  फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेचा ' जप ' करणाऱ्या पुढारी लोकांनी जरा आमच्यासारख्या सामान्यांना हि विचारधारा जरा समजावून द्यावी . ( अर्थात इतर सर्व पुढारी लोकांप्रमाणे त्यांनाही याचा राजकीय फायदा उठवायचा असल्याने त्यांचा ह्या विचारधारेशी काहीही संबंध नाही वा त्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही हे सत्य.) इव्हन प्रकाश आंबेडकरांनासुद्धा ज ंच तर राजकीय फायदा उठवून त्यांचे पुनर्वसन होते काय पाहायचे असावे. त्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सध्या जे रिपब्लिकन पक्षाचे ३८ तुकडे आहेत ते जोडावेत.- मात्र त्यासाठी एकत्रित पक्षाचा अध्यक्ष व्हायची मनीषा त्यांनी सोडावी. ( या ३८ तुकड्यांचा प्रत्येक अध्यक्ष एकत्रित पक्षाचा अध्यक्ष व्हायची मनीषा सोडत नाही म्हणूनच त्याचे एकत्रीकरण होऊ शकत नाही. कारण प्रत्येकजण स्वयंभू. ) आणि म्हणूनच विधासभा-लोकसभा निवडणुकीत यांचा उमेदवार निवडून येत नाही.
  Reply
  1. U
   ulhas
   Jan 3, 2018 at 12:33 pm
   आम्ही पाहतो आहोत हे काय चालले आहे ते. योग्य ते करू.
   Reply
   1. Suhas Sarode
    Jan 3, 2018 at 11:13 am
    ह्या जाती केव्हा जातील ???
    Reply
    1. Ashish Rajiv Ayyar
     Jan 3, 2018 at 10:50 am
     गृहमंत्री कोण आहेत त्यांची जबाबदारी आहे
     Reply
     1. D
      Dhurandhar
      Jan 3, 2018 at 10:47 am
      चव्हाण साहेब तुमच्या दृष्टीने ब्राम्हण असलेला मुख्यमंत्री असल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात दिरंगाई होत आहे. या आधी कित्येक वर्ष काँग्रेस च्या मराठा नेत्यांनी राज्य केला आहे. तेव्हा का नाही दिलात तुम्ही आरक्षण ?
      Reply
      1. D
       dagad
       Jan 3, 2018 at 10:30 am
       इंडियन एक्स्प्रेस मधील या विषयावरची पहिली बातमी एक वेगळे सत्य समोर आणते : indianexpress /article/cities/pune/pune-one-killed-in-violence-near-koregaon-bhima-5008122/lite/
       Reply
       1. Mangesh Deo
        Jan 3, 2018 at 9:56 am
        केवळ स्वत:ला नको असलेल्या जातीचे मुख्यमंत्री आहेत, आणी तेही भाजप सारख्या हिंदुत्वाच्या समर्थक समजल्या पक्षाचे आहेत. अशा परिस्थितीत सत्तेबाहेर राहण्याची सवय व लोकशाहीत आवश्यक असणारी पराभव स्विकारण्याची मानसिकताच नसलेल्या, सत्तेत माझ्याशिवाय दुसरं कोणंच नाय अशा सत्तापिपासू राजकीय मंडळींना जातीय राजकारणाशिवाय दुसरं काय सुचणार ? मग त्या भरात कधीतरी वाट्टेल तशा कमेंट्स करून जातीय भावना भडकावत राहणारे काही राजकारणी, आज शांततेचे आवाहन करताना दिसत असले तरी मनांतला त्यांच्या जातीय द्वेष संपला याची खात्री व्हायला हवी.
        Reply
        1. S
         Shashi
         Jan 3, 2018 at 8:46 am
         मनुवाद्यांचा डाव त्यांच्याच पथ्यावर......
         Reply
         1. T
          TK
          Jan 3, 2018 at 7:34 am
          लक्ष्य म्हणजे काय? गृहमंत्री तेच आहेत ना, त्यांच्याच हातात होत हे सगळं न होऊ देणं. पोलिसांना ३ दिवस आधीपासून कल्पना होती परिस्थितीची. तेव्हा काही केलं नाही मग आता रडून काय उपयोग. स्वतःची अकार्यक्षमता लपवण्या साठी जातीचा (स्वतः च्या किंवा दुसऱ्याच्या) आसरा कशाला घ्यावा
          Reply
          1. अनवट
           Jan 3, 2018 at 6:27 am
           मराठे भाजपाच्या विरुद्ध आहेत हे तुमचेच तर्कट. आता म्हणता दलित हि भाजपच्या विरोधात जात आहेत. मग मराठा-दलित दरी वाढली तर फायदा भाजपाला नाही का? कि दंग्यांमध्ये हिंदुत्ववादी संस्थांचा हात नाहीच असं म्हणायचं आहे तुम्हाला? मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली असलेले पोलीस खात विरोधकांच्या साथीनं खोट्या तक्रारी दाखल करून घेत आहे? या जाती आणि धर्माचे राजकारण काँग्रेस आणि भाजप दोघेही करतात हे शेम्बड पोरग सुद्धा सांगेल. फालतू सबबी सांगणे बंद करा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखा. लोकसत्तेला हाताशी धरून नसत्या वावड्या उठवणे बंद करा.
           Reply
           1. A
            Arun
            Jan 3, 2018 at 4:20 am
            स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमाच्या आयोजनात भागी वक्ते कोणत्या पक्षाचे होते ते सुद्धा लक्षात घ्यायला हवे. इतकी वर्षे त्यांचा महाराष्ट्राबरोबर किती संबंध राहिला आहे? गुजरातमध्ये जातीपातीचे राजकारण थोडे यशस्वी झाल्यावर तोच फॉर्मुला महाराष्ट्रात वापरून पाहिला जात आहे. फडणवीस त्यांना जड झाले आहेत ज्यांना पूर्वीसारखे मोकळे रान मिळत नाही. नोटबंदीच्या फटका सोसतानाच अजून कर्जवाटपात जास्तीची पारदर्शकता आणल्याने ाजिकच त्यांना टार्गेट करण्यासाठीच पडद्यामागून नेहमीच्या खलनायकांचा हा डाव दिसतोय. त्याला फडणवीसांनी पुरून उरायचे कि झुकायचं यावर त्यांच्या मुख्यमंत्री पदाचे कसब दडलंय. मोदी-शहा जोडगोळीची साथ मिळाली तर ह्यातूनही फडणवीस विरोधकांना नक्कीच चीत करतील.
            Reply
            1. Load More Comments