03 March 2021

News Flash

पतीने पोस्टाने पाठवला ‘ट्रिपल तलाक’ पत्नीची पोलिसात धाव

हुंड्यासाठी छळ केल्यानंतर पाठवला तलाक

संग्रहित छायाचित्र

ट्रिपल तलाकपासून मुस्लिम महिलांची सुटका व्हावी म्हणून नरेंद्र मोदी सरकार कठोर कायदा  आणण्याच्या तयारीत आहे. अशात भिवंडीतल्या एका मुस्लिम महिलेला तिच्या नवऱ्याने चक्क पोस्टाने ट्रिपल तलाक पाठवला आहे. १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर हा तलाक पाठवण्यात आला आहे. ज्यानंतर या महिलेने पोलिसात धाव घेतली आहे. नवऱ्याने हुंड्यासाठी छळ केल्याचीही तक्रार या महिलेने केली आहे. याप्रकरणी शांती नगर पोलिसांनी या महिलेच्या पतीविरोधात हुंड्यासाठी त्रास दिल्याचा गुन्हा केला आहे. शांती नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसोर जाधव यांनी ही माहिती दिली आहे.

सरदार मन्सुरी असे या माणसाचे नाव आहे. तर शबनम असे पीडित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शबनमचे सासरे इसरार, सासू जुलेखा, दीर रेहान आणि जाऊ अफरीन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. शबनम आणि सरदार या दोघांचा निकाह मे २०१६ मध्ये झाला होता. त्यानंतर शबनमला तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासरच्या मंडळींनी माहेरून ५० हजार रुपये घेऊन येण्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. तिने ही गोष्ट तिच्या आई वडिलांनाही सांगितली. मात्र ही मागणी शबनमचे आई वडील पूर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर सरदार आणि त्याच्या घरातल्यांनी शबनमचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शबनमने घर सोडले आणि माहेरी जाऊन राहू लागली. शबनमला वाटले की तिच्या नवऱ्याला तिची चूक कळेल.

सरदारला त्याची चूक कळणे तर लांबच राहिले मात्र उलट त्याने शबनमला पोस्टाने ट्रिपल तलाक पाठवला. त्यानंतर भिवंडीत राहणाऱ्या या महिलेने शांती नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्यात महिला तक्रार निवारण केंद्र आहे. या महिला निवारण केंद्राची मदत शबनमने घ्यावी असे आवाहन भिवंडी पोलिसांनी केले आहे. तसेच आम्ही शबनमचा पती आणि तिच्या सासरच्या मंडळींविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी शबनमचे सहकार्य करणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 3:30 pm

Web Title: bhiwandi man sent triple talaq to his wife via registered post after dowry torture
Next Stories
1 होर्डिंगवर दादा, नाना, भाई लिहिणं बंद करा; आदित्य ठाकरेंचा ‘आदेश’
2 धर्मा पाटील मृत्यू प्रकरण: नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार- जयकुमार रावल
3 मुख्यमंत्री राज्य चालवा, भाजपा नको; धर्मा पाटील मृत्यूप्रकरणी शिवसेनेची टीका
Just Now!
X