02 March 2021

News Flash

होऊ दे खर्च..! भारतातली पहिली कॅडिलॅक कार मराठी माणसाच्या दारी

पाच कोटी ५० लाख रूपये किंमत

कॅडिलॅक गाडी प्रथमच भारतामध्ये दाखल झाली आहे. टाटा-बिर्ला-अंबानींच्या घरी नाही, तर भिवंडी येथे राहणाऱ्या एका मराठी माणसाने ही गाडी घेतली आहे. भारतातील ही पहिलीच गाडी आहे. लॅविश आणि लक्झरिअस असलेल्या या कारची किंमत किती आहे माहित आहे? तब्बल पाच कोटी ५० लाख रुपये..

विशेष म्हणजे, जगभरातील महत्वाच्या देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि उद्यागोपतींची पहिली पसंती परदेशातील रस्त्यांवर दिसणारी कॅडिलॅक कार प्रथमच भारतात अवतरली तीही मराठी माणसाच्या दारी. भिवंडीतमधील दिवा गावी राहणाऱ्या अरूण पाटील यांनी कॅडिलॅक गाडी विकत घेतली आहे. अरूण पाटील भिवंडी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे पूर्व सभापती आहेत.

कॅडिलॅक ही गाडी सुरक्षेच्या दृष्टीनेही ‘लय भारी’ आहे. या कारच्या चारही बाजूनं सेन्सर्स आहेत. रस्त्यात खड्डा आला, अपघात होणार असेल, तर कार स्वतःच सावरते. कारचा स्पीड आणि ब्रेक ऑटोमॅटिकली कंट्रोल होतात. कारच्या मागे-पुढे कॅमेरा आहेत. गाडीत क्लायमेट कंट्रोलही होतं. गाडीत वायफायचीही सुविधा आहे. ही गाडी पाहण्यासाठी अरूण पाटील यांच्या घरी बघ्यांच्या गर्दी झाली आहे. परिसरात सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2019 8:41 am

Web Title: bhiwandi municipal corporations ex officer bought luxurious cadillac car
Next Stories
1 शरद पवार, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचा एकाच कारने प्रवास
2 ‘डोके शांत ठेवा’ उदयनराजेंना शरद पवारांचा सल्ला
3 ‘फेसबुक फ्रेंड’ने कल्याणच्या रहिवाश्याला अडीच कोटींना गंडवले
Just Now!
X