14 November 2019

News Flash

भुजबळ-राज भेटीची चर्चा

भुजबळ यांनी मात्र ही भेट राजकीय नव्हती, तर कौटुंबिक होती, असे स्पष्ट केले आहे.

रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी भुजबळ यांचे आगमन झाले होते.

नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असताना आणि विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय तर्कवितर्काना उधाण आले आहे. भुजबळ यांनी मात्र ही भेट राजकीय नव्हती, तर कौटुंबिक होती, असे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र सदन व अन्य काही प्रकरणांच्या गैरव्यवहाराच्या चौकशीत अडकलेले छगन भुजबळ रविवारी सकाळी सपत्निक दादर येथील राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी दाखल झाले.  सुमारे अडीच तास भुजबळ राज यांच्या घरी होते.

First Published on December 7, 2015 1:26 am

Web Title: bhujbal raj meet
टॅग Bhujbal,Raj