30 March 2020

News Flash

छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले

छगन भुजबळ

महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना छातीत दुखू लागल्याने तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.
छगन भुजबळ हे सध्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराप्रकरणी २७ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. याआधीही त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. घरचे जेवण, झोपताना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने श्वास घेणारे उपकरण आणि झोपण्यासाठी गादी उपलब्ध करून देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भुजबळ यांच्याकडून न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यास न्यायालयाने याआधीच परवानगी दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2016 3:53 pm

Web Title: bhujbals health under scanner sent to st george hospital
टॅग Bhujbal
Next Stories
1 देवेंद्र फडणवीसांनी तीन महिन्यांत १८ किलो वजन घटवले!
2 वांद्रे-वरळी सी लिंकवर सुमोची कारला जोरदार धडक; एकाचा मृत्यू
3 आणखी  दोन दिवस ‘ताप’
Just Now!
X