News Flash

मराठीसाठी मंडळ, अकादमीची सूचना

राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य संस्कृती मंडळ यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी घेतला होता.

| July 19, 2015 05:38 am

राज्यातील साहित्य आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी राज्य सांस्कृतिक विकास मंडळ आणि राज्य मराठी साहित्य अकादमी स्थापन करण्याची सूचना राज्य शासनाने स्थापन केलेल्या एका तज्ज्ञ समितीकडून करण्यात आले आहे.
राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य संस्कृती मंडळ यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी घेतला होता. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातून या निर्णयाला विरोध झाल्यानंतर याबाबत विचार करण्यासाठी शासनाने डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने हे विलीनीकरण करण्यास विरोध दर्शविला होता व त्याचबरोबर अशा दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्याची सूचना आपल्या अहवालात केली आहे. राज्य सांस्कृतिक विकास मंडळ ही राज्य शासनाची मध्यवर्ती संस्था असावी आणि त्याअंतर्गत विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र, अशी विभागीय सांस्कृतिक मंडळे स्थापन केली जावीत. त्यावर त्या विभागातील संस्कृतितज्ज्ञ, सांस्कृतिक विषयातील अभ्यासक यांची नेमणूक केली जावी. प्रत्येक विभागीय सांस्कृतिक मंडळाचे तीन ते पाच प्रतिनिधी मिळून राज्य सांस्कृतिक मंडळ तयार केले जावे, अशी शिफारसही या समितीने शासनाकडे केली आहे.संस्कृतीविषयक धारणेत जगभरात गेल्या पन्नास वर्षांत अनेक बदल झाले असून या बदलांची नोंद घेतली आहे, असे काम या मंडळाच्या कामातून होत नाही, असे दिसून येत आहे. त्यामुळे साहित्य-संस्कृती मंडळाचेही विभाजन करून संस्कृती क्षेत्रासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा आणि तीही विकेंद्रित स्वरूपात शासनाने निर्माण करावी, अशी सूचनाही या समितीने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 5:38 am

Web Title: bifurcation of culture academy
Next Stories
1 कोकणात दुसरी वातानुकूलित डबलडेकर?
2 दहिसरमधील मांसाहार वादात राजकीय पक्ष
3 ‘शागीर्द’ स्वरमंचावर तेजश्री अन् ताकाहिरो
Just Now!
X