18 January 2021

News Flash

प्रशासनात पुन्हा मोठे फेरबदल

अहमदनगर जिल्हाधिकारीपदी भोसले; अभिमन्यू काळे अन्न व औषध आयुक्त

(संग्रहित छायाचित्र)

काही दिवसांपूर्वीच राज्य प्रशासन सेवेतून भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी १५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यानुसार अहमदनगर जिल्हाधिकारीपदी राजेंद्र भोसले यांची तर अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी अभिमन्यू काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा कमी महत्त्वाच्या पदावर नियुक्ती देतानाच महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांचीही बदली करण्यात आली आहे. भाजप सरकारच्या विश्वासातील अशी प्रतिमा असलेले प्रवीण दराडे यांची लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, अश्विनी जोशी यांची महाराष्ट्र पेट्रोके मिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आणि पल्लवी दराडे गृह विभागात सह सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर सुधाकर शिंदे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात उपसचिवपदी बदली झाली आहे.

जयश्री भोज यांची माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, डॉ. एम. एस. कलशेट्टी यांची भूजल सर्वेक्षण संस्थेत संचालक म्हणून तर एच.पी. तुमोड यांची दुग्धविकास आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. एम. बी. वरभुवने यांची महात्मा फुले जनआरोग्य योजना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, आर. एस. क्षीरसागर यांची अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, बी. बी. दंगाडे यांची राज्य शुल्क नियंत्रण प्राधिकरणाच्या सचिवपदी नगर परिषद संचालनालयाच्या संचालकपदी

डॉ. के .एच.कु लकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:21 am

Web Title: big change in administration again abn 97
Next Stories
1 विजेचा धक्क्य़ाने दोन कामगारांचा मृत्यू
2 टाटाचे वीजसंच बंद पडल्याने मुंबईतील वीजसंकट चिघळले
3 पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या कार्यामुळे मनुष्यत्वाचा विकास
Just Now!
X