21 September 2020

News Flash

बिहार पोलिसांकडून दिशा सालीयन आत्महत्येचीही चौकशी

सुशांतसिंह प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय

सुशांतसिंह प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालीयन यांच्या आत्महत्यांमध्ये समान धागा असावा, असा संशय बिहार पोलिसांनी व्यक्त केला. बिहारच्या विशेष पथकाने दिशाच्या आत्महत्येबाबत चौकशी सुरू के ली. शनिवारी या पथकाने मालवणी पोलिसांकडून दिशा प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची मागणी केली. दिशाच्या कुटुंबीयांकडेही चौकशी केली जाणार आहे.

दिशाने सुशांतसह ‘छिछोरे’ चित्रपटातील सहकलाकार वरुण शर्मा, सुशांतची प्रेयसी-अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि भारती सिंग यांच्यासाठीही काम केले होते. ९ जूनच्या मध्यरात्री बहुमजली इमारतीवरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. तर १४ जूनला सुशांत मृतावस्थेत आढळला. या दोन्ही घटनांमध्ये समान धागा असावा, असा तर्क सुरुवातीला काढण्यात येत होता. मात्र दिशाच्या मृत्यूबाबत चौकशी करणाऱ्या मालवणी पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये काहीही सबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.

सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, या संशयावरून नोंद गुन्ह्य़ाच्या तपासासाठी बिहारचे विशेष पथक मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाने आतापर्यंत दहा व्यक्तींचे जबाब नोंदवले आहेत. तपासावर देखरेख ठेवणारे बिहारचे विशेष पोलीस अधीक्षक (एसएसपी) उपेंद्र शर्मा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, सुशांतशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्यात येणार आहे. दिशा सुशांतची व्यवस्थापक होती. दोघांनी एका आठवडय़ाच्या आत आत्महत्या करणे हा निव्वळ योगायोग होता का? हे तपासले जाणार आहे.

९ जूनला वांद्रे येथे आयोजित पार्टीतून परतल्यावर दिशाने आत्महत्या केली, अशी चर्चा सुरू आहे. त्याबाबत विचारता, समाजमाध्यमांवर जाहीर होणाऱ्या तपशिलांवर विश्वास ठेवल्यास तपास भरकटू शकेल. त्यामुळे साक्षीदारांची चौकशी, तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावेच तपासाची दिशा ठरवतील, अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी दिली.

सुशांतची दोन बॅँकांमध्ये चार खाती होती. या चारही खात्यांवरून झालेल्या व्यवहारांचे तपशील विशेष पथकाला मिळाले आहेत. या तपशिलांचा बारकाईने अभ्यास सुरू आहे. प्रत्येक व्यवहार तपासून सुशांतच्या खात्यावरून ज्या व्यक्तीच्या, कंपनीच्या, संस्थेच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले, त्या प्रत्येकाकडे विशेष पथक चौकशी करणार आहे. हे पथक सुशांतसोबत वास्तव्य करणारा ‘क्रि एटिव्ह कॉन्टेन्ट मॅनेजर’ सिद्धार्थ पिठानी आणि मुख्य संशयित रियाकडे चौकशी करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 4:00 am

Web Title: bihar police also investigates disha salian suicide case zws 70
Next Stories
1 अतिरिक्त साखरेच्या संकटावर इथेनॉल हाच उपाय – नाईकनवरे
2 विशेष मुलांच्या पालकांना गृहशिक्षणासाठी साहाय्य
3 टायटर चाचणीच्या अटीमुळे ‘प्लाटिना’ प्रकल्पात अडथळे
Just Now!
X