X

बाइक चोरली पण नाकाबंदीत सापडला, वांद्रे पोलिसांची कारवाई

वांद्रे पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका चोराला अटक केली आहे

वांद्रे पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका चोराला अटक केली आहे. नाकाबंदीदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांना संशय आला असता त्यांनी त्याची चौकशी केली. यावेळी तो चालवत असलेली दुचाकी चोरीची असल्याचं समोर आलं. पोलिसांना गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

वांद्रे पोलिसांनी रेक्लमेशन येथे नाकाबंदी लावली होती. यावेळी विकास कारंडे या तरुणाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने दुचाकीवरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी शिताफीने त्याला पकडलं आणि चौकशी केली. यावेळी त्याने बोरिवली येथून दुचाकी चोरी केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आरोपीची चौकशी करत असून अजून कोणत्या दुचाकी चोरींमध्ये त्याचा सहभाग आहे का याचा तपास करत आहे. सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अरुण रामचंद्र चव्हाण आणि पोलीस नाईक संजय वसंत प्रभू यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळेच ही चोरी उघडकीस आली.