News Flash

शेतीमाल थेट ग्राहकांना

राजकीय पेच मिटवून विधानसभेत विधेयक मंजूर

राजकीय पेच मिटवून विधानसभेत विधेयक मंजूर

भाजीपाला, फळांसह शेतीमाल थेट ग्राहकांना विकण्याची मुभा शेतकऱ्यांना देणारे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेने या विधेयकास विरोध करण्यास सुरुवात केल्याने सरकारची नाचक्की किंवा राजकीय कोंडी होण्याची शक्यता दिसू लागल्याने भाजपने हालचाली करून शिवसेनेने सुचविलेल्या सुधारणांवर पावले टाकण्याचे मान्य केल्याने विधेयक मंजूर झाले. थेट शेतीमाल विक्रीची मुभा देण्यात येत असली तरी बाजार समित्यांचे अस्तित्व कायम राखण्यात आले आहे. ही केवळ अतिरिक्त सुविधा असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि कोणाच्याही हक्कांवर गदा येणार नाही, असे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.

या कायद्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होणार असून खासगी व्यापाऱ्यांकडून शेतीमालाचे पैसे मिळण्याची हमी नाही आणि त्यांचा माल विकत घेतला गेला नाही, तर तो ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समांतर यंत्रणा उभारलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायद्याचे उद्दिष्ट जरी असले तरी त्यात सुधारणा आवश्यक असून शहरांमध्ये विक्री केंद्रे उभारून शेतकऱ्यांच्या मालविक्रीची हमी सरकारने देण्याची मागणी काही सदस्यांनी केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 12:08 am

Web Title: bill approved in assembly on direct selling agricultural goods
Next Stories
1 काय आहे वाहून गेलेल्या ‘महाड’ पूलाचा इतिहास?
2 मालमत्ता कर वेळेत न भरल्यास टीव्ही, फ्रिज, एसी, सोफा आणि इतर सामानावर जप्ती
3 चंद्रकांत पाटलांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, अजित पवारांची मागणी
Just Now!
X