‘फायर कॅण्डल’मधील रसायनांमुळे यकृत, मूत्रपिंडांना धोका

वाढदिवशी केक कापण्याआधी त्यावरील ‘फायर कॅण्डल’ पेटवून आतषबाजी करण्याचा प्रकार आता रूढ होऊ लागला असला, तरी हा प्रकार आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा इशारा वैद्यकीयतज्ज्ञांनी दिला आहे.  ‘फायर कॅण्डल’मधून एखाद्या भुईनळय़ासारख्या ठिणग्या उसळत असताना त्याची रासायनिक भुकटी केकवर सांडत असते. पांढऱ्या-करडय़ा रंगाची ही भुकटी केकवर स्पष्टपणे दिसत नसली तरी, तिचे प्रमाण लक्षणीय असते. ही रासायनिक भुकटी केकसोबत पोटात गेल्यास तिच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंड व यकृतावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Hanuman Jayanti
Hanuman Jayanti : हनुमान जयंतीच्या दिवशी मंगळ गोचरमुळे ‘या’ राशींचे नशीब चमकरणार, मिळणार बक्कळ पैसा?
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा

वाढदिवस, लग्नसोहळा अथवा अन्य कोणताही आनंदाचा क्षण केक कापून साजरा करण्याकडे आता कल वाढू लागला आहे. पूर्वी विशेषत: वाढदिवशी पेटती मेणबत्ती विझवून केक कापला जात असे. मात्र, शुभप्रसंगी अग्नी विझवण्याचा प्रकार अशुभ मानला जाऊ लागल्यानंतर आता ‘फायर कॅण्डल’ला पसंती मिळू लागली आहे. फटाक्याची दारू ठासून भरलेली सुरळी पेटवून केक कापण्याची पद्धत आता लोकप्रिय होत आहे. ही ‘बत्ती’ सुमारे दहा ते बारा सेकंद जळते. मात्र, ती पेटत असताना त्यावरील रासायनिक भुकटी खाली केकवर सांडते. असा केक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फटाक्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दारूमध्ये सल्फर डायऑक्साईड, मॅग्नेशिअम क्लोराईड यांसारखे घातक घटक असतात. याचा दूरगामी परिणाम मूत्रपिंड आणि यकृतावर होतो. सातत्याने अशा विषारी घटकांशी संपर्क आल्यास मूत्रपिंड आणि यकृत निकामी होण्याची शक्यता असते, असे फोर्टिस रुग्णालयाचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. राकेश पटेल यांनी सांगितले. त्याबरोबर केकवर लावलेल्या या ‘फायर कॅण्डल’ जळताना मोठय़ा प्रमाणात धूर बाहेर पडत असतो. लहान मुलांना तर अशा धुराचा इतक्या जवळ संपर्क आल्यास पुढे जाऊन त्यांना श्वसनाचे त्रासही होऊ शकतात. या बाबी प्रथमदर्शनी खूप क्षुल्लक वाटत असल्या तरी या रसायनांच्या सेवनांमुळे काही वर्षांमध्ये पोटासंबंधातील आजार उद्भवण्याची शक्यता असते. अनेक देशांत अशा ‘फायर कॅण्डल’ केकवर पेटवण्यावर बंदी आणल्याचेही डॉ. पटेल यांनी सांगितले.

बंदी असतानाही..

केकवर ठेवणारी ‘फायर कॅण्डल’ प्रकारातील मेणबत्ती चीनमध्ये तयार करण्यात येते. भारतात अशा चिनी फटाक्यांना बंदी आहे. या फटाक्यांमध्ये सल्फर डायऑक्साईड, सॉल्ट पिटर, मॅग्नेशिअम क्लोराईड या विषारी रसायनांचा समावेश असतो. त्यात चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या फटाक्यांमधील रसायने अधिक धोकादायक आहेत, असे कुर्ला येथील ‘सुप्रीम’ फटाक्याच्या दुकानाचे माल राज नथानी यांनी सांगितले.

फटाक्यांमधून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रिक ऑक्साईड यांसारखे विषारी वायू बाहेर पडतात. केकमध्ये लावलेली मेणबत्ती जळताना त्यातून हे विषारी वायू बाहेर पडतात. सातत्याने अशा वायूशी संबंध आल्यास निरोगी व्यक्तीलाही श्वसनाचे आजार होऊ शकतात. मात्र संवेदनशील, अ‍ॅलर्जी असलेल्या किंवा दमा असलेल्या रुग्णांवर याचा परिणाम प्रामुख्याने दिसून येतो.

डॉ. अरविंद काटे, श्वसन विकारतज्ज्ञ