मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांची निष्पक्षपातीपणे चौकशी करून त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजप प्रदेश महिला मोर्चाकडून शनिवारी राज्यभर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले.
राज्यात १०० ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. सुमारे २० हजार महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. करोनाचे सर्व नियम पाळून तीव्र आंदोलन करण्यात आले, असे भाजपतर्फे सांगण्यात आले.
महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड येथे निदर्शने करण्यात आली. या वेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस दीपाली मोकाशी आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. आमदार सीमा हिरे यांनी नाशिक येथे आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार विद्या ठाकूर, श्वोता महाले आणि मनीषा चौधरी याही आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2021 1:57 am