News Flash

प्रियंका गांधींमध्ये लोकांना इंदिरा गांधींची झलक दिसते; शिवसेना नेत्याकडून कौतुक

प्रियंका यांच्या सक्रिय राजकारणात येण्याने काँग्रेसला याचा फायदा होईल असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेसने पक्षात महत्वाची जबाबदारी देत राजकारणाच्या आखाड्यात उतरवलेल्या प्रियंका गांधींच्या राजकीय प्रवेशाचे शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी कौतुक केले आहे. तसेच त्यांनी प्रियंका गांधींची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. प्रियंका यांच्या सक्रीय राजकारणात येण्याने काँग्रेसला याचा फायदा होईल असेही त्या म्हणाल्या.

कायंदे म्हणाल्या, काँग्रेसला प्रियंका गांधी यांच्या चांगल्या व्यक्तीमत्वाचा नक्कीच फायदा होईल. मतदारांवर ते आपली छाप पाडू शकतात. त्यांची हीच प्रतिमा त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्याशी मिळती जुळती आहे. यापूर्वीही प्रियंका गांधी यांच्यामुळे काँग्रेसला अनेक निवडणुकांमध्ये फायदा झाला आहे. तरुणांमध्ये त्या अधिक लोकप्रिय आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 10:24 am

Web Title: bjp ally shiv sena praised priyanka gandhi and compared her with indira gandhi
Next Stories
1 रोडरोमियोच्या जाचाला कंटाळून सोलापूरमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
2 बीडमध्ये सेप्टिक टँकची दुरूस्ती करताना दोघांचा मृत्यू
3 मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X