News Flash

मुंबईसह कोकणात ‘अटलबंधन’

मात्र ‘अटलबंधन’बाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मात्र कोणतीच कल्पना नाही.

Raosaheb Danve : मित्रपक्षांनी स्वत:ची ताकद पाहून जागा मागितल्या पाहिजेत. भविष्यात शक्य झाले तरच युती करू, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सेनेला एकप्रकारे प्रतिआव्हान दिले आहे.

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मात्र अनभिज्ञ

मुंबईसह कोकणात ‘अटलबंधन’ मोहीम राबविली जाणार असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मात्र ‘अटलबंधन’बाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मात्र कोणतीच कल्पना नाही.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईसह कोकणात ‘अटलबंधन’ ही मोहीम राबविली जाणार असून गणेशोत्सवात त्यावर भर दिला जाईल.

प्रसाद लाड यांनी कल्पना मांडली आणि आम्ही या मोहिमेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरुवात केल्याची माहिती अ‍ॅड. शेलार यांनी दिली.

केवळ कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांचाही भाजपशी स्नेह वाढावा, यासाठी ‘अटलबंधन’ योजना राबविली जाणार आहे. मात्र यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना कल्पनाच नसल्याने राज्य पातळीवर ही मोहीम राबविण्यात येणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तसेच, यामुळे या योजनेवरून सत्ताधारी भाजपमध्येच संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 3:12 am

Web Title: bjp atal bandhan in mumbai and konkan
Next Stories
1 भूमिहिनांसाठी जमीन खरेदीच्या निधीत सहा लाख रुपयांची वाढ?
2 मंत्रालयाच्या विस्तारित इमारत दुरुस्तीचा ‘नागपुरी घाट’!
3 मुंबईतील वाहतूक समस्येबाबतच्या अनास्थेवरून
Just Now!
X