News Flash

भाजपकडून शिवसेनेच्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न

गेली आठ वर्षे रखडलेल्या हार्बर मार्गाचे काम हे शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे झाले.

शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर

खासदार गजानन कीर्तिकर यांचा आरोप

अंधेरी ते गोरेगाव हार्बर मार्गाचा विस्तार हा शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे झाला आहे. स्थानिक भाजपच्या आमदार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर या कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावत आहे. त्यामुळे गेले साडेतीन वर्षे भाजपचे दुखणे सहन करावे लागत असून शिवसेनेच्या कामाचे श्रेय लाटून भाजप शिवसेनेच्या कामात व्यत्यय आणत असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी  केला आहे.

गेली आठ वर्षे रखडलेल्या हार्बर मार्गाचे काम हे शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे झाले. हार्बर रेल्वेचे गोरेगावपर्यंत विस्तार झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याचे कीर्तिकर म्हणाले. १५ जानेवारी २०१५ला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन २०१५-१६च्या अर्थसंकल्पात यासाठी वाढीव निधी मिळण्याची मागणी केली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०१५ रोजी मुंबईतील खासदार आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यातील बैठकीत या प्रकल्पातील अडथळे आणि कामाची स्थिती याविषयी चर्चा करण्यात आली होती. ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासोबतच्या बैठकीत बहुतांश काम पूर्ण झालेले असताना लोकल सुरू होण्यास विलंब का होत आहे, याबाबत जाब विचारून ठोस कारवाईची मागणी केली होती.

हार्बर रेल्वेच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला असतानाच गुरुवारी पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमात भाजपने नेहमीप्रमाणे गोंधळ घातला असा आरोप किर्तीकर यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 4:32 am

Web Title: bjp attempts to take credit of work done shiv sena
Next Stories
1 आमदारांची सहल ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला
2 कचरा कंत्राट प्रस्ताव पुन्हा लांबणीवर
3 राष्ट्रवादीचे सोमवारपासून सरकारविरुद्ध हल्लाबोल आंदोलन
Just Now!
X