News Flash

“कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे,” भाजपा नेत्याचं महापौरांना उत्तर

मुंबई तुंबल्यानंतर महापौर आणि विरोधक आमने-सामने

अतुल भातखळकरांचं महापौरांना प्रत्युत्तर

पहिल्याच मोसमी पावसातच मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईची दाणादाण उडाली. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने उपनगरीय रेल्वे बंद करण्याची वेळ आली. साचलेले पाणी, खड्डे यांमुळे रस्त्यावरील वाहने तासनतास एकाच जागी उभी होती. दरम्यान भाजपाने यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. नालेसफाईच्या कंत्राटांमध्ये गेल्या पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी बुधवारी केला. दरम्यान या सर्व टीकेला उत्तर देताना महापौरांनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महापौरांनी काय म्हटलं होतं

विरोधी पक्षाकडून मालाड इमारत दुर्घटनेमुळे आणि पावसातल्या महापालिकेच्या नियोजनामुळे मोठ्या प्रमाणावर टीका असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी, भाजपाला वाट्टेल ते बरळण्याचा पूर्व अधिकार आहे, ते स्वप्नात आहेत म्हणून बरळत आहेत. त्यांनी भो भो करत राहावं, असं उत्तर दिलं होतं.

“…त्या पाच वर्षाच्या मुलाचा काय दोष”, मुंबईच्या महापौरांचा प्रश्न

अतुल भातखळकरांचं प्रत्युत्तर-

अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं असून, “माननीय महौपार किशोरी पेडणेकर यांचं हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे,” असा टोला लगावला आहे.

अतुल भातखळकरांचं महापौरांना उत्तर

पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागांत काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वाराही वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोेल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस, तर घाट क्षेत्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे.मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

बुधवारी २०० मिमीची मर्यादा ओलांडणाऱ्या मुंबई उपनगरात गुरुवारी केवळ ४६.८ मिमी पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे केवळ १०.२ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत पुढील काही दिवस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा म्हणजेच १५.६ मिमी ते ६४.६ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे; मात्र काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार म्हणजेच ६४.५ मिमी ते २०४.४ मिमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या दोन दिवसांत ठाणे, मुंबई, रायगड येथे झालेला पाऊस हा दीर्घकालीन अंदाजाच्या तुलनेत ६० टक्के अधिक आहे. तसेच पालघर आणि रत्नागिरी येथे झालेला पाऊस दीर्घकालीन अंदाजाच्या तुलनेत २० ते ५९ टक्के अधिक आहे. मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून मुंबईतील कमाल तापमानात कमालीची घट झाली आहे. बुधवारी सांताक्रूझ येथे २९.७ अंश सेल्सिअस तर, कुलाबा येथे २८.४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 11:51 am

Web Title: bjp atul bhatkhalkar mayor kishori pednekar mumbai waterlogging rain sgy 87
Next Stories
1 सरकारी केंद्रांत होता लसींचा दुष्काळ तर खासगी रुग्णालयात सुकाळ
2 अनधिकृत बांधकामांचे मालाड मालवणी!
3 चुनाभट्टी स्थानकातील पाणी ओसरण्यास १५ तास
Just Now!
X