01 December 2020

News Flash

मुंबईतील मतदारयाद्यांत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप

मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमधील मतदारयाद्यांमध्ये सत्ताधारी पक्षांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष

| September 7, 2013 06:04 am

मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमधील मतदारयाद्यांमध्ये सत्ताधारी पक्षांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने तशी तक्रार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांच्याकडे केली. त्यावर तक्रार असलेल्या मतदारयाद्यांची फेरतपासणी करण्याचे आश्वासन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम मतदारसंघात भाजप व इतर विरोधी पक्षांच्या उमेदवारांना मतांची आघाडी मिळाली होती. त्याच मतदारसंघातील मतदारांची नावे मोठय़ा प्रमाणावर वगळण्यात आली आहेत. उलट काँग्रेसला ज्या मतदारसंघांमध्ये कमी मते मिळाली आहेत. त्या मतदारसंघांतील यादीतून एकाही मतदाराचे नाव कमी करण्यात आले नाही. विशेष म्हणजे जे मतदार हयात आहेत, ते पूर्वीच्याच पत्त्यावर राहात आहेत. तरीही त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 6:04 am

Web Title: bjp climes ruling parties influence voters lists
Next Stories
1 शक्ती मिल परिसर सुरक्षित करा
2 ‘सीएनजी’ दरवाढीचा फटका
3 चाकरमान्यांना टोलमुक्ती नाहीच
Just Now!
X