28 September 2020

News Flash

आयुक्तांच्या बदलीवरून भाजपाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

प्रवीण परदेशी यांच्या बदलीवरुन प्रवीण दरेकर यांची टीका

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची ठाकरे सरकारने बदली केली आहे. त्यांना आता नगरविकास खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरुन भाजापने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे. आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुक्तांची बदली करणे हा मार्ग नाही. अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी उपाय योजना सशक्त आणि गतिमान करण्याची आवश्यकता आहे असं ट्विट करत दरेकर यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून UDD चे प्रधान सचिव असलेले इकबाल चहल हे काम पाहतील. तर ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांना नगरविकास खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 7:36 pm

Web Title: bjp criticized thackeray government on praveen pardeshis transfer scj 81
Next Stories
1 मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली, इकबाल चहल नवे आयुक्त
2 Video: रुग्णालयाच्या खिडकीमधून उडी मारुन करोनाचा रुग्ण पळाला
3 मुंबईत लष्कर बोलवणार? पोलीस सांगतात अफवा पसरवू नका!
Just Now!
X