25 January 2021

News Flash

…मग ठाकरे सरकार आता सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का? – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर फडणवीसांचा सवाल

संग्रहित

स्थलांतरित मजुरांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या दाव्यांवर चपराक आहे असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आम्हाला महाराष्ट्रविरोधी म्हणणारं महाविकास आघाडी सरकार आता सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधान भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“स्थलांतरित मजुरांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या दाव्यांवर चपराक आहे. मजुरांची कुठेही नोंद नाही, त्यांना जेवण मिळालं नाही, त्यांच्यासाठी योग्य व्यवस्था उभी करण्यात आली नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये आलं आहे. इतर कोणत्याही राज्यावर नाही तर फक्त महाराष्ट्रावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. आमच्या वतीने मुद्दे उचलले जात होते तेव्हा सरकार आम्हाला तुम्ही विरोधासाठी विरोध करत असून महाराष्ट्रविरोधी आहात असं म्हणत होतं. पण मग आता तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“एखादा मुद्दा विरोधी पक्षाने चांगल्यासाठी मांडला तर त्याची दखल घेऊन कारवाई झाली पाहिजे. पण दुर्दैवाने तसं न झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला अक्षरश: चपराक दिली आहे,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पावसाळी अधिवेशन लांबणीवर
“करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन ३ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला आहे. याशिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखादं दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकराचं नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. करोनाच्या बाबतीच आधी मुंबईची जास्त चिंता होता पण आता उर्वरित महाराष्ट्रातही प्रकऱणं वाढत आहेत. “नियंत्रणात आणण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस दोन दिवस कोकण दौऱ्यावर
देवेंद्र फडणवीस ११ आणि १२ जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. ११ जून रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चोल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी ते भेटी देणार आहेत. तर १२ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, अंजर्ले, पाजपांढरी आणि दापोली येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील आणि स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 7:24 pm

Web Title: bjp devendra fadanvis on supreme court uddhav thackeray mahavikas aghadi sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 “मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणी मारामारी करायला येत नाही”, उद्धव ठाकरेंनी फेटाळलं ‘ते’ वृत्त
2 मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! डबलिंग रेट, मृत्यूदरात मोठी घट; आदित्य ठाकरेंची माहिती
3 करोना काळातही संघ दक्ष, मुंबईवर लक्ष!
Just Now!
X