News Flash

पालिका निकालात ‘ते’ तिघे सरस

राष्ट्रवादीच्या सांगलीतील बालेकिल्ल्यात पतंगरावांची सरशी

भाजपच्या यशाचे शिल्पकार मुख्यमंत्री;राष्ट्रवादीच्या सांगलीतील बालेकिल्ल्यात पतंगरावांची सरशी

विधान परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचे शिल्पकार साहजिकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. पण त्याचबरोबर काही नेत्यांनी आपापल्या भागांमध्ये विजय संपादन केला आहे. त्याच वेळी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात विजय संपादन करण्यात यशस्वी झालेले काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम आणि परळीत बाजी मारणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मिळविलेला विजयही तेवढाच लक्षणीय आहे.

भाजपच्या विजयाचे सारे श्रेय हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आहे. फडणवीस यांनी राज्यात ४०च्या आसपास प्रचारसभांमध्ये भाषणे केली. वास्तविक यापूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एवढे लक्ष घातले नव्हते. पण फडणवीस हे  सर्वत्र गेले. भाजपच्या नगराध्यक्षाला निवडून द्या, हे शहर मी दत्तक घेईन, असे आश्वासन देत मतदारांवर प्रभाव पाडला. याचा भाजपला फायदा झाला. १४७ पैकी सर्वाधिक ५१ पालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. थेट नगराध्यक्षाची निवडणूक आणि प्रचाराच्या काळात फक्त नगराध्यक्षाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याची मुख्यमंत्र्यांची रणनीती यशस्वी झाली. मराठा समाजाचे मोर्चे आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतरही भाजपला राज्यात मिळालेले यश हे लक्षणीय मानले जाते. मराठा समाजाच्या मोर्चाचा उलटा फायदा करून घेण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले. कारण मराठा समाजाच्या मोर्चाची प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली आणि दलित व इतर मागासवर्गीयांची मते भाजपला मिळाली.

भाजपच्या यशात मुख्यमंत्र्यांबरोबरच अन्य काही नेत्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्य़ांमध्ये भाजपने शिरकाव केला. कोल्हापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीला घाम फोडला. याचे सारे श्रेय महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना जाते. राष्ट्रवादीतील अस्वस्थ किंवा नाराज नेत्यांना गळाशी लावण्याचे दादांचे प्रयत्न यशस्वी झाले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचाही जळगावच्या विजयात मोठा सहभाग आहे. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थकाचा पत्ता कापून ती जागाजिंकण्याबरोबरच नगरपालिका निवडणुकीत जळगावमध्ये भाजपचे कमळ कोमेजणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या चंद्रपूर या प्रभावक्षेत्रात वर्चस्व कायम राखले.

पतंगरावांची सरशी

काँग्रेसच्या राजकारणात डॉ. पतंगराव कदम हे नेहमीच भावी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात. प्रत्येक नेतृत्व बदलाच्या वेळी डॉ. कदम यांनी दिल्लीदरबारी प्रयत्न केले, पण दिल्लीने त्यांना गांभीर्याने घेतले नाही. सांगलीचा किल्ला राखण्याची किमया मात्र पतंगरावांनी साध्य केली. विधान परिषदेच्या सांगली-सातारा मतदारसंघात यश मिळविणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. आपले बंधू मोहनराव कदम यांना उभे करून राष्ट्रवादीला हादरा दिला. सांगलीत काँग्रेसमध्ये वसंतदादा पाटील घराण्याची महत्त्वाकांक्षा कायम आहे. दादांच्या घराण्याला पतंगरावांचे वर्चस्व मान्य होणे कठीणच आहे. पण दादांच्या वारसदारांची समजूत काढण्यात पतंगरावांना यश आले. यात पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची ठरली. राष्ट्रवादीचा अभेद्य गड पतंगरावांनी भेदला. ‘काही कमी’ पडणार नाही याची खबरदारी घेतली. परिणामी सातारा-सांगली या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. ‘सारे प्रतिकूल वातावरण असतानाही काँग्रेसचा उमेदवार निवडून आणणे कठीण होते, पण हे सारे सर्वाच्या सहकाऱ्याने शक्य झाले, अशी प्रतिक्रिया डॉ. कदम यांची आहे. विधान परिषदेपाठोपाठ सांगली जिल्ह्य़ात डॉ. कदम यांच्या प्रभाव क्षेत्रात काँग्रेसला यश मिळाले. विधान परिषद, नगरपालिकेतील यशानंतर आगामी लोकसभा वा विधानसभा निवडणुकीत पुत्र व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना यश मिळवून देणे हे पतंगरावांचे स्वप्न आहे.

धनंजय मुंडे यांचे वजन वाढले

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन चुलत भाऊ-बहिणीत परळीचा सामना रंगला होता. दोन्ही बाजूने सारी ताकद लावण्यात आली. पंकजा यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांनी परळीत सभा घेतल्या, तरीही ३३ पैकी २७ जागा जिंकून धनंजय यांनी बहिणीवर मात केली. राष्ट्रवादीने नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून मुंडे यांना उतरविले होते. राज्यभर ३० ते ३५ ठिकाणी जाऊन प्रचार सभा घेतल्या. अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे एकापेक्षा एक दिग्गज नेते असतानाही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने प्रचाराकरिता धनंजय मुंडे यांना पुढे केले होते. इतर मागासवर्गीय चेहरा आणि आक्रमक वक्तृवशैली असल्याने पक्षाने मुंडे यांचा वापर करून घेतला. राज्याच्या अन्य भागांत पिछेहाट झाली असताना मराठवाडय़ात राष्ट्रवादीला मिळालेले यश किंवा परळीची एकहाती सत्ता मिळवून देणारे धनंजय मुंडे यांचे राजकीय वजन निश्चितच वाढले आहे.

गटातटाच्या राजकारणात प्रबळ

काँग्रेसच्या राजकारणात डॉ. पतंगराव कदम हे नेहमीच भावी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात. प्रत्येक नेतृत्व बदलाच्या वेळी डॉ. कदम यांनी दिल्लीदरबारी प्रयत्न केले, पण दिल्लीने त्यांना गांभीर्याने घेतले नाही. सांगलीचा किल्ला राखण्याची किमया मात्र पतंगरावांनी साध्य केली. विधान परिषदेच्या सांगली-सातारा मतदारसंघात यश मिळविणे ही अशक्यप्राय गोष्ट होती. आपले बंधू मोहनराव कदम यांना उभे करून राष्ट्रवादीला हादरा दिला. सांगलीत काँग्रेसमध्ये वसंतदादा पाटील घराण्याची महत्त्वाकांक्षा कायम आहे. दादांच्या घराण्याला पतंगरावांचे वर्चस्व मान्य होणे कठीणच आहे. पण दादांच्या वारसदारांची समजूत काढण्यात पतंगरावांना यश आले. यात पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची ठरली. राष्ट्रवादीचा अभेद्य गड पतंगरावांनी भेदला. ‘काही कमी’ पडणार नाही याची खबरदारी घेतली. परिणामी सातारा-सांगली या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. ‘सारे प्रतिकूल वातावरण असतानाही काँग्रेसचा उमेदवार निवडून आणणे कठीण होते, पण हे सारे सर्वाच्या सहकाऱ्याने शक्य झाले, अशी प्रतिक्रिया डॉ. कदम यांची आहे. विधान परिषदेपाठोपाठ सांगली जिल्ह्य़ात डॉ. कदम यांच्या प्रभाव क्षेत्रात काँग्रेसला यश मिळाले. विधान परिषद, नगरपालिकेतील यशानंतर आगामी लोकसभा वा विधानसभा निवडणुकीत पुत्र व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना यश मिळवून देणे हे पतंगरावांचे स्वप्न आहे.

धनंजय मुंडे यांचे वजन वाढले

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन चुलत भाऊ बहिणीत परळीचा सामना रंगला होता. दोन्ही बाजूने सारी ताकद लावण्यात आली. पंकजा यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांनी परळीत सभा घेतल्या, तरीही ३३ पैकी २७ जागा जिंकून धनंजय यांनी बहिणीवर मात केली. राष्ट्रवादीने नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून मुंडे यांना उतरविले होते. राज्यभर ३० ते ३५ ठिकाणी जाऊन प्रचार सभा घेतल्या. अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे एकापेक्षा एक दिग्गज नेते असतानाही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने प्रचाराकरिता धनंजय मुंडे यांना पुढे केले होते. इतर मागासवर्गीय चेहरा आणि आक्रमक वक्तृत्वशैली असल्याने पक्षाने मुंडे यांचा वापर करून घेतला. राज्याच्या अन्य भागात पिछेहाट झाली असताना मराठवाडय़ात राष्ट्रवादीला मिळालेले यश किंवा परळीची एकहाती सत्ता मिळवून देणारे धनंजय मुंडे यांचे राजकीय वजन निश्चितच वाढले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2016 1:24 am

Web Title: bjp devendra fadnavis ncp dhananjay munde patangrao kadam
Next Stories
1 राष्ट्रवादीची पुण्यात खरी कसोटी
2 रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्यवस्थापनाविरोधात पतसंस्थांचा एल्गार
3 मुंबई सीसीटीव्हीचा पॅटर्न आता राज्यभरात!
Just Now!
X