News Flash

“रोज लसीचा पुरवठा होतोय, मंत्र्यांनी राजकारण बंद करावं”, फडणवीसांनी सरकारला सुनावलं!

फडणवीस म्हणतात, "देशात सर्वाधिक लसींचा पुरवठा महाराष्ट्राला होतोय!"

संग्रहीत

महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांसाठी पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईत ३ दिवसांचाच लसींचा साठा शिल्लक असून केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. “लसीकरणाबाबत केले जात असलेले आरोप चुकीचे असून राज्य सरकारमधील मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं बंद करावं, लोकांच्या जिवाशी खेळू नये”, असं फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दाव्यानंतर राज्यातल्या लसीकरण कार्यक्रमाचं काय होणार? यावर चर्चा सुरू झाली होती. लसींचा पुरवठा कमी पडल्यास राज्यातील लसीकरणामध्ये खंड पडेल की काय? अशी देखील शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उलट राज्य सरकारवरच निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्राला देशात सर्वाधिक लसी”

“लसीकरणाबाबतचा आरोप चुकीचा आहे. मुळातच आपली लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा आपल्याकडे नियमितपणे होत असतो. लसींचा देशभरात पुरवठा होत आहे. देशात सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. रोज साठा येत असतो. आपल्याला काही लसींची साठेबाजी करायची नाहीये”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

“….तर तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं,” राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती

“मीडियात बोलायचं आणि हात झटकायचे”

दरम्यान, यावेळी फडणवीसांनी राज्य सरकारनं या मुद्द्यावर करत असलेलं राजकारण बंद करावं, अशा शब्दांत टीका केली आहे. “भारत सरकार काही वेगळं नाहीये. या सगळ्या गोष्टी मीडियात बोलण्याऐवजी भारत सरकारशी चर्चा करून का करता येत नाहीत. आपलं कुणी जाऊन दिल्लीत किंवा पुरवठादारांकडे जाऊन का बसत नाही. फक्त मीडियात बोलायचं आणि हात झटकायचे हे बंद व्हायला हवं. गांभीर्य यायला हवं. प्रत्येक वेळी विरोधकांना म्हणायचं राजकारण करू नका आणि मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं हे बंद करा. लोकांच्या जिवाशी खेळू नका”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबईत ३ दिवस पुरतील इतकेच लसीचे डोस शिल्लक! मुंबईच्या महापौरांनी दिली चिंता वाढवणारी माहिती!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 2:59 pm

Web Title: bjp devendra fadnavis slams uddhav thackeray on corona vaccine shortage pmw 88
Next Stories
1 मुंबईत बेडची कमतरता नाही, फक्त प्रोटोकॉल पाळा बेड मिळेल – आयुक्त इक्बालसिंह चहल
2 मिरा-भाईंदरमधील धक्कादायक प्रकार : करोनाबाधित रुग्णाऐवजी दुसऱ्यालाच दिला प्लाझ्मा
3 शरद पवारांनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस; परिचारिकेचे आभार मानत म्हणाले….
Just Now!
X