बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्रात शिवसेनेसोबतची  नैसर्गिक मत्री भाजपला जपावी लागणार हे स्पष्ट झाल्याने, गेले काही महिने रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आता हिवाळी अधिवेशनाआधी होणार असून शिवसेनेच्या आणखी दोघांचा राज्यमंत्री म्हणून फडणवीस सरकारात समावेश होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याशिवाय, सेनेच्या दोघा कॅबिनेट मंत्र्यांचा खातेपालट करून भाजपकडील काही महत्वाची खातीही सेनेकडे सोपविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सेनेचे नेते व मंत्र्यांची तातडीची बठक बोलाविली होती. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तृतीय स्मृतिदिनाची आखणी व नियोजन यांवरही या बठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. येत्या 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राज्याच्या कानाकोपरयातून असंख्य शिवसनिक व चाहते मुंबईत दाखल होणार असल्याने मुंबईचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत होणार नाही, व राज्यातून येणारया प्रत्येक शिवसनिकास बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करता येईल अशा तरहेने त्या दिवसाचे नियोजन करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी या बठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईच्या सावरकर मार्गावरील महापौर निवास परिसरात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यावर याआधीच सरकारकडून संमती मिळालेली असल्याने आता या प्रकल्पास गती येण्याच्या दृष्टीने मंत्र्यांनी पाठपुरावा करावा अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या.राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत दोनच दिवसांपूर्वी राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.या पाश्र्वभूमीवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली असून सेनेला दोन नवी राज्यमंत्रीपदे देण्याचे निश्चित झाले आहे, असे या सूत्रांनी सांगितले. सध्या शिवसेनेकडे असलेल्या परिवहन व वने या कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाऐवजी, ग्रामविकास व अन्य एक कॅबिनेट मंत्रिपद सेनेला मिळावे, यासाठीही सेना प्रयत्नशील आहे. मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान हा खांदेपालटही होण्याची शक्यता असल्याचे संकेत या सूत्रांनी दिले.

एकत्र काम करण्यावर एकमत
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अगोदरच दीर्घकाळ रखडला असून आता तो लवकरात लवकर पूर्ण करावा अशी अपेक्षा सेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या बठकीनंतर बोलून दाखविली. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची दाणादाण उडाल्यामुळे महाराष्ट्रात सेनेसेबोत जुळवून घेण्याचे धोरण भाजपने स्वीकारले असून आता राज्यातील उभयतांमधील संघर्षांला पूर्णविराम देऊन सामंजस्याने राज्याच्या प्रश्नांवर एकत्र काम करण्यावर ठाकरे व फडणवीस यांच्या चच्रेत एकमत झाल्याचे या सूत्रांनी सांगितले.