News Flash

आता कुठे गेली असहिष्णुता?

भाजप सरकारच्या काळात असहिष्णुतेवरून वारंवार टीका होत होती.

संग्रहित छायाचित्र

 

आशीष शेलार यांचा शरद पवार यांना सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर संदेश लिहिणाऱ्या व्यक्तीचे मुंडण करून बेदम मारहाण करण्यात आली. महिला विरोधात बोलली तर तिलाही अपमानित करण्यात आले, याकडे लक्ष वेधत आता तुम्हाला ही असहिष्णुता वाटत नाही का, असा सवाल भाजपचे नेते आशीष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे.

भाजप सरकारच्या काळात असहिष्णुतेवरून वारंवार टीका होत होती. त्याचा संदर्भ घेत शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या अमृता देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजमाध्यमांवर झालेली अपमानास्पद विधाने आणि वडाळा येथील एकाचे शिवसैनिकांनी केलेले मुंडण  या दोन घटनांवरून महाविकास आघाडी सरकारला चिमटे काढले आहेत. या दोन्ही घटना असहिष्णुतेच्या वाटत नाही का, असा सवाल करत शेलार यांनी पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर या राज्यात हिंदू सुरक्षित आहेत का, हिंदू व महिलांना आता असेच अपमानास्पद वागवणार का, असा सवाल शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

शांत राहून पराभव करायचा-आदित्य ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शांत आहेत. तुम्हीही त्यांचेच अनुकरण करा. समाजमाध्यमांवरील जल्पकांना उत्तर देण्याची गरज नाही. ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असतात. आपण शांत राहूनच त्यांचा पराभव करायचा आहे, असे आवाहन युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 3:10 am

Web Title: bjp government ashish shelar sharad pawar ncp shiv sena uddhav thackeray akp 94
Next Stories
1 कल्याण-डोंबिवली दरम्यान रेल्वे सेवा आज चार तास बंद
2 शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मान्यता
3 मुख्यमंत्री कार्यालयासाठी दोन पत्रकारांची धडपड
Just Now!
X