News Flash

स्वबळाचा नारा, पण कितपत शक्य?

राज्यात गेल्या १३ पैकी पाच निवडणुकांमध्येच एकाच पक्षाला बहुमत

राज्यात गेल्या १३ पैकी पाच निवडणुकांमध्येच एकाच पक्षाला बहुमत

संतोष प्रधान, लोकसत्ता

मुंबई : राज्यात भाजपने स्वबळाचा नारा दिला असला तरी राज्यात १९९० पासून कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. याशिवाय मोदी लाटेत भाजप किं वा जनता लाटेत जनता पक्षालाही स्वबळावर राज्याची सत्ता हस्तगत करता आली नव्हती. आतापर्यंत राज्यात झालेल्या १३ विधानसभा निवडणुकांपैकी पाच निवडणुकांमध्ये एका पक्षाला बहुमत मिळाले होते व उर्वरित वेळी आघाडय़ा किं वा युत्यांचा प्रयोग करण्यात आला होता.

राज्यात स्वबळावर सत्ता हस्तगत करण्याची सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या नेत्यांना के ली. प्रमोद महाजन हे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असताना त्यांनी  राज्यात ‘शत प्रतिशत‘ची योजना मांडली होती. हे उद्दिष्ट भाजपला अद्याप तरी साध्य करता आलेले नाही. २०१४मध्ये मोदी लाटेतही भाजपला स्वबळावर सत्ता मिळविता आली नव्हती. तेव्हा भाजपला अनुकू ल वातावरण असतानाही स्वबळावर लढणाऱ्या भाजपला १२२ जागांवर मजल मारता आली होती. १४४चा जादुई आकडा गाठण्याकरिता भाजपला शिवसेनेची मदत घ्यावी लागली. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले होते, पण अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर युती तुटली. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी आकारास आली. या नव्या राजकीय समीकरणात भाजप एकाकी पडला. परिणामी भाजपला स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही.

आणिबाणीनंतर १९७७ मध्ये देशात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. देशात जनता पक्षाची लाट आली होती. त्यानंतर वर्षभरात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाला सत्ता मिळेल, असा विश्वास व्यक्त के ला जात होता. परंतु १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता पक्षाला सर्वाधिक ९९ जागा मिळाल्या होत्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ६९ तर इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या होत्या. दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन

के ली होती. पुढे शरद पवार यांच्या बंडानंतर हे सरकार गडगडले होते व पवारांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे सरकार सत्तेत आले होते. जनता लाटेतही महाराष्ट्रात जनता पक्षाला स्वबळावर सत्ता मिळाली नव्हती.

महाराष्ट्रात १९६२ ते १९७२ आणि १९८० व ८५ मध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले होते. आतापर्यंत झालेल्या १३ विधानसभा निवडणुकांमध्ये  पाच निवडणुकांचा अपवाद वगळल्यास कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. म्हणजेच राज्यात आतापर्यंत काँग्रेस या एकमेवर पक्षाला स्वबळावर सत्ता किं वा पूर्ण बहुमत मिळाले होते.

राज्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेतल्यास कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याचे दिवस गेले आहेत. १९९० पासून हा कल सुरू झाला. आधी काँग्रेस पक्षाचे मजबूत संघटन होते आणि पक्षाची पाळेमूळे भक्कम रोवली गेलेली होती. १९९० मध्ये प्रथमच भाजप-शिवसेना युतीने काँग्रेसपुढे आव्हान उभे के ले. तेव्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली होती, पण १४४चा बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. त्यानंतर १९९५ पासून तर युती किं वा आघाडीच्या सरकारांचे दिवस आले. २०१४ मध्ये देशातील राजकीय चित्र बदलले आणि मोदी यांच्या नेतृत्वाखील भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. यानंतर विविध राज्यांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळविली. राज्यात मात्र भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली नाही. पाच वर्षे सत्ता उपभोगल्यावरही २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळावर निवडणुकांना समोरे जाण्याचे टाळले होते. याऐवजी टोकाशी मतभेद झालेल्या शिवसेनेबरोबर युती के ली होती. लोकसभा निवडणुकीत युतीचा प्रयोग यशस्वी झाला, पण विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोघांची पिछेहाट झाली. या पार्श्वभूमीवर राज्याची एकहाती सत्ता हस्तगत करण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल.  जेव्हा के व्हा निवडणुका होतील तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील नाराजी उफाळून आली तर भाजपला फायदा होऊ शकतो. राज्यात स्वबळावर सत्ता हस्तगत करण्याऐवझी भाजपची ताकद निर्माण झालेली नाही हे भाजपचे नेते खासगीत मान्य करतात.

राज्यातील १९९० पासून सर्वाधिक जागा मिळालेले राजकीय पक्ष

* १९९० – काँग्रेस -१४१ जागा

* १९९५ – शिवसेना-७३, भाजप-६५

* १९९९ – काँग्रेस-७५

* २००४ – राष्ट्रवादी-७१, काँग्रेस-६९

* २००९ – काँग्रेस-८२, राष्ट्रवादी-६२

* २०१४ – भाजप-१२२

* २०१९ – भाजप -१०५, शिवसेना-५६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 1:42 am

Web Title: bjp in maharashtra bjp to contest elections alone in maharashtra zws 70
Next Stories
1 वाढीव वीजदेयकात सवलतीचा प्रस्ताव
2 खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मराठा समाजाला लागू नाही!
3 गुणवंतांचा टक्का वाढल्याने अकरावीच्या प्रवेशाचा पेच
Just Now!
X