भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल हा खटला दाखल करण्यात आला असून किरीट सोमय्या यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसल्याचं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी किरीट सोमय्यांकडून या गोष्टी रचण्यात आल्या असल्याचा दावा रवींद्र वायकर यांनी केला आहे. दरम्यान, खटला दाखल करण्यात आल्यानंतर किरीट सोमय्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
kolhapur raju shetty marathi news, raju shetty latest news in marathi, raju shetty telescope marathi news, raju shetty durbin marathi news
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सचिन वाझे जेलमध्ये असल्याने उद्धव ठाकरेंनी बहुतेक माझ्याकडून १०० कोटी वसूल करायला सांगितलं असल्याचा आऱोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले आहेत की, “सचिन वाझे जेलमध्ये बंद आहे, त्यामुळे त्याच्याकडून येणारे १०० कोटी मिळणार नाहीत म्हणून बहुतेक उद्दव ठाकरेंनी वायकरांना यावेळी सोमय्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून १०० कोटी वसूल करायला सांगितलं. अशा धमक्यांना आम्ही भिक घालत नाही”. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारचे, सचिन वाझेसह सगळे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असाही इशारा दिला आहे.

तसंच अजून एक ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “संजय राऊत यांची “शेवटची चेतावणी”…प्रताप सरनाईक ची 100 कोटीची नोटीस…रविंद्र वायकरचा 100 कोटीचा दावा…वाह रे ठाकरे सरकार”.

किरीट सोमय्या यांनी केलेली वक्तव्यं बेजबाबदार आणि खोटी असून राजकीय फायदा मिळवण्यासाठी केली असल्याचं वायकर दांपत्याने म्हटलं आहे. वायकर यांच्या म्हणण्यानुसार, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी किरीट सोमय्यांकडून या गोष्टी रचण्यात आल्या आहेत. आपल्या पक्षातील महत्व कमी होत असल्यानेच ते वाढवण्यासाठी किरीट सोमय्या आधारहीन आरोप करत महाराष्ट्राच्या नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे टार्गेट करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केली असून गैरव्यवहार केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे. या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल त्यांनी ३ मार्चला रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. जमिनींच्या दस्तऐवजात छेडछाड करण्यात आलेली आहे. वन कायद्याचा भंग, वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी तक्रारीत केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे.

अलिबागमधील कोर्लाई येथील जमिनीवर १९ बंगले असल्याचा आणि ही माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचाही उल्लेख सोमय्यांनी केला आहे. तसंच मुंबईत महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात रविंद्र वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवा यांच्याकडून २५ कोटींचा मोबदला मिळाल्याचा सोमय्यांचा दावा आहे.