27 November 2020

News Flash

“भगवा तर तुम्ही तुमच्याच हातानं उतरवला, आता मुंबईकर करून दाखवतील”

आशिष शेलारांचा शिवसेनेवर टीकेचा बाण

मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भारतीय जनता पक्षाने असे ठरवले आहे की, या वेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला होता. दरम्यान, भाजपांही यावर प्रत्युत्तर देत भगवा तर तुम्ही तुमच्याच हातानं उतरवला असं म्हणत टीकेचा बाण सोडला आहे.

“१०५ हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला, कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली, याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला, ज्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार करुन महाराष्ट्र लुटला त्यांच्या सोबत सत्तेत बसलात तेव्हाच “भगव्याचा” रंग तुम्हीच फिका केलात. भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात,” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.

आणखी वाचा- …शिवसेनेला जनता पाताळात गाडेल, २०२२ मध्ये त्याची सुरुवात होणार – भातखळकर

“भ्रष्टाचाराला कंटाळून आता मुंबईकरच आता महापालिकेवर पारदर्शक कारभाराची, विकासाची गुढी उभारतील. गुढीला ‘शुद्ध भगव्याची’ झालर चढवतील. तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा. मुंबईकरांना चॅलेंज देताय मुंबईकरच आता करुन दाखवतील,” असंही ते म्हणाले.

काय म्हटलेलं सामनाच्या अग्रलेखात?

मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भारतीय जनता पक्षाने असे ठरवले आहे की, या वेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे.

विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बिहारवर भगवा फडकवू किंवा भगवा फडकला असे विधान भाजप पुढाऱ्यांकडून झाल्याचे स्मरत नाही. कारण त्यांचा तसा भगव्याशी संबंध नाही. शिवसेनेशी युती झाल्यापासून त्यांचा भगव्याशी संबंध आला. भाजप शिवसेनेसोबत नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे. आता भाजपमध्ये कुणी प्रतिशिवाजी निर्माण झाले असतील व त्यांनी त्यांचा स्वतंत्र भगवा निर्माण केला असेल तर तो त्यांचा प्रश्न. शिवरायांचे सातारा व कोल्हापूरच्या गादीचे वंशज भाजपमध्ये सामील करून घेतले आहेत, पण भगव्याची मालकी मराठी शिवरायांच्या प्रजेकडे म्हणजे मराठी जनांकडेच आहे. तोच भगवा मुंबईवर पन्नास वर्षांपासून फडकत आहे.

मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे ही १०५ मराठी हुतात्म्यांशी सरळ सरळ बेइमानी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:11 pm

Web Title: bjp leader ashish shelar criticize shiv sena bmc flag saamna editorial comment former cm devendra fadnavis jud 87
Next Stories
1 …शिवसेनेला जनता पाताळात गाडेल, २०२२ मध्ये त्याची सुरुवात होणार – भातखळकर
2 “पालिकेवरून भगवा उतरवणं म्हणजे मुंबई भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणसाला गुलाम करण्यासारखे”
3 मॉलना चटके!
Just Now!
X