News Flash

“काँग्रेसच्या सहवासात ठाकरे सरकार…”; अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून आशिष शेलारांची टीका

अर्णब गोस्वामी यांना करण्यात आली अटक

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. यावरून आता निरनिराळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत असून भाजपा आमदार आशिष शेलार यांनीदेखील या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक. सरकार विरोधात सोशल मीडियावर बोलणाऱ्या निवृत्त नौदल अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचंच झालंय. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या. वा रे वा लोकशाही सरकार!,” असं म्हणत आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला. “काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस. महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने जात आहे का?,” असा सवालही शेलार यांनी केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकावर टीका केली.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

आणखी वाचा- “आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण…,” अर्णब गोस्वामी अटकेवरुन फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण?

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 10:01 am

Web Title: bjp leader ashish shelar criticize thackeray government over republic tv arnab goswami arrest mumbai police jud 87
Next Stories
1 हे तर आणीबाणी सारखं, माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ल्याचा निषेध – जावडेकर
2 रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
3 फराळालाही महागाईची लागण!
Just Now!
X