07 March 2021

News Flash

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला कृष्णकुंजवर

दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे

भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी पोहचले होते. ही बैठक घरगुती स्वरूपाची असली तरीही राजकीय चर्चा झाल्याचेही बोलले जाते आहे. राज यांच्या मुलाचे म्हणजेच अमित ठाकरे यांच्या मुलाचे लग्न आहे. या लग्नात भाजपाच्या कोणाकोणाला निमंत्रण द्यायचे यासंबंधीची चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. मात्र या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती समजते आहे.

२७ जानेवारीला अमित ठाकरेचे लग्न होणार आहे. मुंबईतील लोअर परळ या भागात असलेल्या सेंट रेजिसमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. बॅरिअॅट्रिक सर्जन संजय बोरुडे यांची मुलगी मिताली आणि अमित ठाकरे हे दोघे या दिवशी विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून मैत्री होती ज्याचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता हे दोघेही लग्न करणार आहेत.

आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात दोन तास गप्पा सुरु होत्या. अमित ठाकरेचे लग्न आणि निमंत्रण याशिवाय विधानसभा आणि लोकसबा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही गुफ्तगू झालं असावं अशी शक्यता वर्तवली जाते आहे. याआधीही आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात बैठका पार पडल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 5:58 pm

Web Title: bjp leader ashish shelar meet raj thakrey at krushnkunj
Next Stories
1 शरद पवारांकडे काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही-मुख्यमंत्री
2 नगरमध्ये बिनशर्त पाठींब्याला तयार होतो, पण शिवसेनेचा प्रतिसादच नाही : मुख्यमंत्री
3 ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याबाबत काँग्रेसनं स्पष्टीकरण द्यावं : मुख्यमंत्री
Just Now!
X