08 March 2021

News Flash

मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार; सायन रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

नितेश राणेंनी यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये काही मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांच्या शेजारीच रुग्णावर उपचार सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “जर परिस्थितीत हाताळता येत नसेल तर पालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा,” असंही ते म्हणाले

“सायन रुग्णालयात रुग्ण हे मृतदेहांच्या शेजारी झोपून उपाचर घेत आहेत. हे कोणत्या प्रकारचं प्रशासन आहे. हा प्रकार अतिशय लज्जास्पद आहे,” अशा आशयाचं ट्विट राणे यांनी केलं आहे. त्यांच्या ट्विटनंतर काही वेळातच मोठ्या प्रणामात हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ” तो व्हिडीओ सायन रुग्णालयातील असल्याची कबुली रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी दिली आहे. काही जणांचे नातेवाईक त्यांचे मृतहेद घेण्यासाठी आले नाहीत म्हणून आम्ही ते त्या ठिकाणी ठेवले आहेत. यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांनी कसली अपेक्षा ठेवावी? खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना घेत नाहीत आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अशी परिस्थिती आहे. ही आरोग्य आणीबाणी आहे,” असं राणे म्हणाले.“काल रात्रीपासून सायन रुग्णालयाकडून हा व्हिडीओ बनावट असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आता त्यांनी यावर धक्कादायक उत्तर दिलं आहे. पालिका प्रशासनावर आणि आरोग्य विभागावर आता विश्वास राहिला नाही. जर परिस्थिती हाताळणं जमत नसेल तर पालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा,” असंही राणे यांनी नमूद केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 1:08 pm

Web Title: bjp leader nitesh rane shares video sion hospital mumbai doctors treating patients near bodies jud 87
Next Stories
1 गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचं उद्या लग्न; ‘या’ अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ
2 “चला एकत्र जाऊ आणि IFSC मुंबईतच झाले पाहिजे असं केंद्राला सांगू”; भाजपा नेत्याचे राज्य सरकारला आवाहन
3 मुंबईकरांच्या चिंतेत भर : पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण देशाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त
Just Now!
X