News Flash

नालेसफाईवरील कोट्यवधींचा खर्च जातो कुठे?; राम कदमांचा मुंबई महापालिकेला सवाल

मुंबईची परिस्थिती कधी सुधारणार, कदम यांचा सवाल

“मुंबईतील नालेसफाईवर होणारा कोट्यवधींचा खर्च जातो कुठे?,” असा सवाल भाजपाचे नेते आमदार राम कदम यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचराही साठलेला दिसत आहे.

राम कदम यांनी मुंबईतील एका नाल्याचा व्हिडीओ शेअर करून यावर होणारा कोट्यवधींचा खर्च जातो कुठे असा सवाल केला आहे. तसंच मुंबईतील नाले हे डप्मिंग ग्राऊंड बनले आहेत. मुंबई महानगरपालिकेचा नाले सफाईचा दावा खोटा आहे. हा आजचा (गुरूवार) व्हिडीओ आहे. दरवर्षी कोट्यवधींचा होणारा खर्च जातो कुठे?, मुंबईची परिस्थितीत सुधारणार केव्हा?, आता हा जुना व्हीडीओ आहे असं म्हणू नका,? माझ्यासोबत चला आणि परिस्थितीत पाहा,” असं राम कदम म्हणाले. त्यांनी ट्विटरवर यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे.

राम कदम यांनी बुधवारीही असाच एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये नाल्यातील पाणी वस्तीत घुसल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच या पाण्यातून दुचाकीही वाहून जाताना दिसली होती. हा व्हिडीओ शेअर करताना कदम यांनी पालिकेचा नालेसफाईचा दावा एका दिवसात फेल झाला असल्याचं म्हटलं होतं. तसंच आता आम्ही आरोप करतोय असं म्हणू नका. मुख्यमंत्र्यांनी आपल्या डोळ्यांनी हे पाहावं, असं ते म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 6:03 pm

Web Title: bjp leader ram kadam criticize mumbai municipal corporation drain cleaning tweeter jud 87
Next Stories
1 सफाई कर्मचारी बनले लिपीक; वसई-विरार महापालिकेतील मोठा घोटाळा उघड
2 काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची करोनावर मात, अखेर १० दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज
3 मध्यमवर्गीयांची कथा चित्रपटातून मांडणारे दिग्दर्शक बासू चटर्जी यांचं निधन
Just Now!
X