16 July 2019

News Flash

उंदीर मंत्रालयात नाही यांच्या डोक्यात आहे – सुधीर मुनगंटीवार

काँग्रेसने गोड बोलून शेतकऱ्यांना फसवलं. आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. काँग्रेसला देश प्राप्त करण्याची इचछा असून काँग्रेस म्हणजे कौरव सेना आहे. आत ही कौरव सेना

काँग्रेसने गोड बोलून शेतकऱ्यांना फसवलं. आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. काँग्रेसला देश प्राप्त करण्याची इच्छा असून काँग्रेस म्हणजे कौरव सेना आहे. आत ही कौरव सेना एकत्र येत आहे अशी घणाघाती टीका भाजपाचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केली आहे. ते वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात बोलत होते.

उंदीर मंत्रालयात नाही यांच्या डोक्यात आहे असे ते म्हणाले. एकनाथ खडसेही मंचावर उपस्थित आहेत. एकनाथ खडसेंनीच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप करत स्वपक्षाला अडचणीत आणले होते. सत्ता मिळवण्यासाठी जाती-जातीमध्ये विष कालवल जातय अये मुनगंटीवर म्हणाले.

आज देशात सर्वत्र भाजपाचे सरकार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यावेळी मीडियाने वाजपेयींच्या वक्तव्यायवर टीका केली होती असे ते म्हणाले. मुनगंटीवर यांच्याआधी भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाषण झाले. आपली काम लोकांपर्यंत पाहोचली तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असे ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रात 26 पैकी 16 जागा मिळवू असा त्यांनी दावा केला.

First Published on April 6, 2018 1:02 pm

Web Title: bjp maha melava bandra mmrda ground sudhir mungantiwar