आज देशात कमळ फुलले आहे. केंद्रात, देशातील २२ राज्यांमध्ये, महापालिका, नगरपालिकांमध्ये भाजपाची सत्ता आहे. भाजपाचं विराट स्वरुप आज आमच्यासमोर आहे. अनेक नेते, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे हे शक्य झाले असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते.
काँग्रेस सरकारने १२०० कोटी खर्च केले पण सिंचन फक्त १ टक्के झाले. पण मोदी सरकारने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. पीक विम्यासंबंधी महत्वाचे निर्णय घेतले. काँग्रेसच्या राजवटीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले तरच शेतकऱ्याला मदत मिळायचीय. मोदींनी ती 33 टक्क्यांवर आणली
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवारची योजना यशस्वी करुन दाखवली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाची सत्ता आणण्याचे आपले उद्दिष्टय असेल असे रावसाहेब दानवे म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2018 1:51 pm