३८ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आज भाजपाचा भव्य महामेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात पक्षाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जोरदार भाषणे झाली. त्या भाषणातील काही निवडक मुद्दे

देवेंद्र फडणवीस

– कितीही लांडगे एकत्र आले तरी 2019 मध्ये लाल किल्ल्यावर भाजपाचा झेंडा फडकणार

– कितीही लांडगे आले तरी ही सिंहाची पाठ आहे

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. आम्हाला जे परवडतं तेच आम्ही देतो, आम्ही चहा देतो, तुम्ही जे पिता ते आम्हाला परवडत नाही.

– भटा-बामणांची पार्टी म्हणून हिणवलेल्या भाजपामध्ये आज समाजातील प्रत्येक घटक असल्याचं फडणवीस म्हणाले.

– पवार साहेब उगाच चहावाल्यांच्या नादी लागू नका. जरा 2014 आठवा की चहावाल्यांनी तुमची काय हालत केली. उगाच नादी लागू नका नाहीतर तुमची काय हालत होईल याचा विचार केला

– साडेतीन वर्षांमध्ये एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण न झाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या विरोधकांनी साडेचार लाख रुपयांच्या उंदरांच्या गोळ्या काढल्या.

अमित शाह

– 2019 लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. पुढच्यावर्षी होणारी 2019 सालची लोकसभा निवडणूक आपल्याला खोट्या आश्वासनावर जिंकायची नाहीय. आपली काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असे शाह म्हणाले.

– राहुल बाबा तुम्ही साडेचारवर्षांचा हिशोब मागता ? देशाची जनता तुमच्याकडे चार पिढयांचा हिशोब मागतेय. तुम्ही इतकी वर्षा सत्ता असून काय केले ?

– मोदी आणि फडणवीस सरकारवर कोणीही एक आरोप करू शकलेलं नाही. शेतकरी आत्महयेचा आकडा फडणवीस सरकारच्या राज्यात कमी झाला.

– राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि तुम्हाला हटवू देणार नाही असे अमित शाह म्हणाले.

– जवानांची मुंडी छाटली जात होती. त्यावेळी सरकारला काही फरक पडत नव्हता. पण आम्ही उरीचा बदला घेतला. संपूर्ण जगात एक वेगळा संदेश गेला. देशाकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला.

नितीन गडकरी

नितीन गडकरी म्हणाले आम्ही योजना लागू करताना कधी धर्माचा, जातीचा विचार केला नाही. आम्ही कधीच धर्म, जातीचे राजकारण केले नाही.

– काही लोक महाराष्ट्रावर राज्य करणे आपला अधिकार समजत होते. ते निराश झालेत. जे प्रकल्प बंद पडलेत ते एक वर्षात पूर्ण करू.

– शिवाजी महाराजांचा नाव घेत महाराष्ट्राला लुटलं. ते लोक महाराष्ट्रात जातपातीच विष कालावतायत असे गडकरी म्हणाले.

– जे 50 वर्षात झालं नाही ते 5 वर्षात झालं हे पाहून काहीच पोट दुखतंय असे गडकरी म्हणाले. देशाचं भविष्य बदलायचं असेल तर मोदींशीवाय पर्याय नाही.