गरीबीला जात, धर्म पंथ नसतो. आम्ही योजना लागू करताना कधी धर्माचा, जातीचा विचार केला नाही. आम्ही कधीच धर्म, जातीचे राजकारण केले नाही असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते..

आम्हाला नवभारताची निर्मिती करायची आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन विकास साधायचा आहे. 4 कोटी लोकांच्या घरात वीज नव्हती. आज आम्ही 50 टक्के काम पूर्ण केलं आहे. 2019 पर्यंत 8 कोटी लोकांच्या घरी सिलेंडर पोहचेल असा दावा त्यांनी केला. 31 कोटी लोकांनी जन धन योजनेत खाती उघडली. ज्यांनी या योजनांचा लाभ घेतला ते कोण होते याचा विरोधकांनी विचार करावा असे गडकरी म्हणाले.

काही लोक महाराष्ट्रावर राज्य करणे आपला अधिकार समजत होते. ते निराश झालेत. जे प्रकल्प बंद पडलेत ते एक वर्षात पूर्ण करू. सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करु. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची समस्या होणार नाही. महाराष्ट्रात 1 लाख कोटी रुपये सिंचनासाठी दिलेत असे त्यांनी सांगितले.

ज्यांना प्रश्न पडलेत त्यांना आव्हान देतो त्यांनी शिवाजी पार्कात चर्चेला यावं. 4 लाख कोटी रुपयांचे रस्ते मंजूर केले. शिवाजी महाराजांचा नाव घेत महाराष्ट्राला लुटलं. ते लोक महाराष्ट्रात जातपातीच विष कालावतायत असे गडकरी म्हणाले. शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत. प्रत्येक निर्णय घेताना प्रत्येक हाताला रोजगार अन सामाजिक एकता कशी निर्माण होईल हे पाहिलं जातं. हा पक्ष पिता पुत्रांचा नसून कार्यकर्त्यांचा आहे. जे 50 वर्षात झालं नाही ते 5 वर्षात झालं हे पाहून काहीच पोट दुखतंय असे गडकरी म्हणाले. देशाचं भविष्य बदलायचं असेल तर मोदींशीवाय पर्याय नाही तसेच महाराष्ट्रच सिंचन 40 टक्क्यांच्या पुढे नेणार असे गडकरी म्हणाले.

50 वर्षात जे केल नाही ते काम 5 वर्षात केलं, ही पार्टी माँ बेट्याची नाही कार्यकर्त्यांची पार्टी आहे असं गडकरी म्हणाले. नदीजोड प्रकल्पासाठी 40 हजार कोटी रुपये खर्च करत असून उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ उरणार नाही असं ते म्हणाले. काँग्रेसच्या काळात सिंचन 18 टक्के होतं, ते आम्ही 40 टक्के करू असं गडकरी म्हणाले.