29 May 2020

News Flash

भाजप आमदार केळकर यांचे तावडेंवर टीकास्त्र

अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील घोटाळे ‘सिटिझन फोरम’ने उघडकीस आणली

विनोद तावडे

अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील घोटाळे ‘सिटिझन फोरम’ने उघडकीस आणली असून अनेकदा पत्रव्यवहार करूनही अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच त्यांच्या प्राचार्यावर कारवाई केली जात नाही, अशा शब्दात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. तावडे यांना या सर्वाची जबाबदारी घ्यावी लागेल असे स्पष्ट करत, आठवडय़ात संबंधित प्राचार्य व महाविद्यालयांवर कारवाई न केल्यास मी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करेन, असा इशारा केळकर यांनी दिला.
‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद’, तंत्रशिक्षण संचालनालय तसेच मुंबई विद्यापीठ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या संगनमतानेच अनेक वर्षे अभियांत्रिकी महाविद्यालये व शिक्षण सम्राटांमुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 1:00 am

Web Title: bjp mla comment on vinod tawde
टॅग Bjp,Vinod Tawde
Next Stories
1 अधिकाऱ्यांच्या बदल्या मूळ जिल्ह्य़ात नको!
2 उपसचिवाला लाच घेताना अटक
3 बंद उद्योगांच्या जमिनी खुल्या करण्याच्या निषेधार्थ मोर्चा
Just Now!
X