22 October 2020

News Flash

१२ प्रभाग समित्यांवर शिवसेनेचा भगवा

मुंबई महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका बुधवारपासून टप्प्याटप्प्याने घेण्यात येत होत्या.

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या मदतीने मुंबई महापालिकेतील १७ पैकी १२ प्रभाग समित्यांची सत्ता आपल्याकडे राखण्यात सत्ताधारी शिवसेनेला यश आले, तर भाजपला पाच समित्यांवर समाधान मानावे लागले. गतवर्षी जिंकलेल्या चार समित्या यावेळी भाजपने गमावल्या, तर शुक्रवारी झालेल्या एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगरसेविकेचे मत बाद झाल्यामुळे भाजपला पराभव पत्करावा लागला.

मुंबई महापालिकेतील १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका बुधवारपासून टप्प्याटप्प्याने घेण्यात येत होत्या. शुक्रवारी आर-दक्षिण, आर-उत्तर आणि आर-मध्य, एम-पूर्व, एम-पश्चिम, एस आणि टी या सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. एम-पूर्व प्रभागात शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, तर एम-पश्चिम प्रभागात भाजपचे महादेव शिगवण यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. आर-दक्षिण प्रभाग समितीत १० मते मिळवून भाजपच्या लिना पटेल विजयी झाल्या. तर आर-उत्तर आणि आर-मध्य प्रभागात शिवसेनेच्या सुजाता पाटेकर या विजयी झाल्या. एन प्रभाग समितीमध्ये राष्ट्रवादी मदतीला धावून आल्यामुळे शिवसेनेच्या स्नेहल मोरे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. एस आणि टी प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे आठ, राष्ट्रवादी एक, काँग्रेस एक, तर भाजपचे १० नगरसेवक आहेत. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिळणारी मते लक्षात घेऊन या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडण्याची चिन्हे होती. त्यामुळे या समितीच्या अध्यक्षपदाचा निकाल चिठ्ठीवर अलवंबून राहणार होता. मात्र मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपच्या रजनी केणी यांच्याकडून स्वाक्षरी करताना चूक झाली आणि त्यांचे मत अवैध ठरले. त्यामुळे शिवसेनेच्या दीपमाला बढे १० मते मिळवून विजयी झाल्या.

पालिका सभागृहात गोंधळ

रजनी कोळी यांचे मत अवैध कसे ठरले हे दाखवावी अशी मागणी भाजप नगरसेवक सातत्याने करीत होते. त्यामुळे पालिका सभागृहात गोंधळ उडाला. या गोंधळातच कामकाज संपविण्यात आले. यामुळे भाजप नगरसेवक संतप्त झाले आणि सत्ताधारी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी पालिका मुख्यालय दणाणून सोडले. नगरसेविकेने स्वाक्षरी चुकीच्या ठिकाणी केल्याचा दावा करण्यात येत होता. मतपत्रिका दाखवावी, अशी मागणी वारंवार आम्ही करीत होतो. परंतु ती दाखविण्यात आली नाही, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 1:37 am

Web Title: bjp ncp shivsena congress twelve committee shiv sena power akp 94
Next Stories
1 ऐन नवरात्रीत गोंधळी कलावंतांच्या जगण्याचा ‘गोंधळ’
2 करोनाकाळात लेखक-दिग्दर्शकांची कसरत
3 मास्क परिधान करा, अन्यथा कारागृहाची शिक्षा?
Just Now!
X