News Flash

बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात – नितेश राणे

"कडवट शिवसैनिकांना विचाराल तर तेदेखील राज ठाकरेंचंच नाव घेतील"

बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात असं वक्तव्य भाजपा नेते नितेश राणे यांनी केलं आहे. बाळासाहेबांच्या विचारावर पहिल्या अर्थाने जे चालत होते ते राजसाहेबच होते. कडवट शिवसैनिकांना विचाराल तर तेदेखील राज ठाकरेंचंच नाव घेतील. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी साजेसी आहे अशा शब्दांत नितेश राणे यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून भाषण करुन अंतरगं भगवा होत नाही असा टोला लगावला.

“बाळासाहेब ठाकरेंची जयंती असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यापैकी कुणीही अभिवादन केलं नाही. या गोष्टी शिवसेना, उद्धव ठाकरेंना मान्य आहे का ? अशी विचारणा नितेश राणे यांनी केली आहे. “संजय राऊत काही बोलले तर दिल्लीवरुन फोन येतो आणि ते शब्द मागे घेतात,” असंही यावेळी ते म्हणाले.

आणखी वाचा – “मनसेच्या बदलत्या भूमिकेमागे शरद पवारांचा हात”

शिवसेनेवर टीका करताना नितेश राणे यांनी म्हटलं की, “शब्दापलीकडे जाऊन कृतीतून तुम्ही काय करत आहात हे सर्वांना दिसत आहे. संजय राऊत सकाळी वेगळं बोलतात आणि संध्याकाळी वेगळं बोलतात. तुम्ही पारंपारिक मतदारांची फसवणूक करत आहात. महाविकास आघाडीत तुमची गळचेपी, अपमान होत असल्याचं दिसत आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना कुठे दिसणार नाही. तेव्हा उद्धव ठाकरेंना कोणाचं किती भगवं राहिलं आहे हे कळेल”.

महाविकासआघाडीचे मंत्री खिसे भरण्यापुरते आहेत अशी टीका यावेळी त्यांनी केली. शेतकऱ्यांचा सातबाराकोरा केला का? कर्जमाफी झाली का ? असे सवाल यावेळी त्यांनी विचारले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 1:26 pm

Web Title: bjp nitesh rane mns raj thackeray shivsena uddhav thackeray sgy 87
Next Stories
1 … तर आरपीएफ देणार महिलांना ‘होम ड्रॉप’
2 रात्रीची मद्यबंदी कायम ठेवणे कठीण
3 तिसऱ्या निविदेनंतरही एकच कंत्राटदार
Just Now!
X