News Flash

भाजपचे लाड २१० कोटींचे मालक

लाड यांच्यावर केवळ मालमत्तेशी सबंधित काही खटले दाखल आहेत.

प्रसाद लाड

विधान परिषदेच्या एका रिक्त जागेसाठी येत्या ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि घटक पक्षाचे उमेदवार दिलीप माने यांच्या विरोधात भाजपने मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि तब्बल २१० कोटींचे धनी असलेल्या प्रसाद लाड यांना रिंगणात उतरविले आहे.

प्रसाद लाड यांनी निवडणूक अर्जासोबत आपल्या आपल्या सांपत्तिक स्थितीचे विवरणपत्र आयोगास सादर केले असून त्यात स्वत:ची स्थावर मालमत्तेची किंमत ५५ कोटी ८६ लाख तर जंगम मालमत्ता ४७ कोटी ७१ लाख रुपये एवढी दाखविली आहे. लाड यांच्या पत्नी नीता यांची स्थावर मालमत्ता ५४ कोटी १९ लाख तर जंगम मालमत्ता ४८ कोटी ९५ लाख इतकी आहे. मुलगी सायलीकडे एक कोटी १५ लाखाची जंगम आणि चार कोटींची स्थावर मालमत्ता आहे. मुलाच्या नावावर १८ लाखांची आणि एकत्रित कुटुंबाकडे दोन कोटींची मालमत्ता आहे. लाड यांच्याकडे ३१ लाख रुपयांची १२ घडय़ाळे, सोने आणि हिऱ्याचे असे दीड कोटींचे दागिने तसेच मारुती स्विफ्ट बरोबरच, १९ लाखांची टोयाटा करोला ही आलिशान गाडीही आहे. त्यांच्या पत्नीकडे सव्वा किलो सोने, दीड किलो चांदी, दोन कोटींचे हिरे असे अडीच कोटींचे दागिने आहेत. मुलीकडे चार लाखांचे हिरे आणि मुलाकडे ४९ लाखांचे दागिने आहेत.

लाड यांच्याकडे अहमदनगर जिल्ह्य़ात सहा एकर तर पत्नीच्या नावे खालापूर येथे दीड एकर जागा आहे. लाड यांचा सायन येथील शिवाजी फोर्ट गृहनिर्माण संस्थेत १९०० चौरस फुटाचा फ्लॅट असून त्याची किंमत चार कोटी ७१ लाख आहे. याच सोसायटीत पत्नीच्या नावे ३.६३ कोटींचा फ्लॅट आहे. २०० कोटींची मालमत्ता असलेल्या प्रसाद लाड यांच्यावर ४१ कोटींचे कर्ज असून वादग्रस्त अशी ३७ लाख ६६ हजारांची सरकारी देणी थकलेली आहेत. पत्नीच्या नावावरही २१ कोटींचे कर्ज आहे. लाड यांच्यावर केवळ मालमत्तेशी सबंधित काही खटले दाखल आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 2:21 am

Web Title: bjp prasad lad property maharashtra legislative council
Next Stories
1 वातानुकूलित लोकल २५ डिसेंबरपासून सेवेत?
2 स्मारकासाठी महापौर बंगल्याचीच जागा कशाला?
3 लिंगबदल शस्त्रक्रियेच्या सुट्टीसाठी ‘मॅट’मध्ये जा!
Just Now!
X