17 February 2020

News Flash

भाजपाध्यक्ष अमित शहांनी घेतली शरद पवारांची भेट

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज ब्रीज कॅंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

| December 13, 2014 03:12 am

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज ब्रीज कॅंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शहांनी पवार यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली. तब्बल वीस मिनिटे झालेल्या या भेटीचा तपशील अद्याप कळू शकलेला नाही.  कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजीत पवार आणि सुनील तटकरे यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर पवार आणि शहा यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
गेल्या आठवडय़ात नवी दिल्लीतील निवासस्थानी घसरून पडल्याने पवार यांच्या पायाचे हाड फॅक्चर झाले. पवार यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्यांच्यावर ब्रिच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवार यांना अजून दोन दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

First Published on December 13, 2014 3:12 am

Web Title: bjp president amit shah meet ncp chief sharad pawar
Next Stories
1 राजकीय संरक्षणामुळेच गुंड टोळ्यांचा उच्छाद
2 राज ठाकरे यांना नोटीस मिळालीच नाही
3 पॅकेजेस् उदंड, तरीही शेतकरी कासावीसच!
Just Now!
X