News Flash

भाजपा मेळावा: मुंबईकरांनो आज ‘या’ मार्गावरील प्रवास टाळाच !

मुंबईत प्रवेश करणाऱ्या चार चेक नाक्यांवर मालवाहने, अन्य अवजड वाहनांना बंदी. बेस्टकडून १७० जादा बसगाडय़ांचे नियोजन

(संग्रहित छायाचित्र)

भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आज (६ एप्रिल) रोजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते येणार आहेत. त्यामुळे होणारी गर्दी पाहता वांद्रे-कुर्ला संकुलात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून त्यानुसार पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या चार चेक नाक्यांवर मालवाहने आणि अन्य अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बेस्टकडूनही १७० जादा बसगाडय़ांचे नियोजनही करण्यात आले आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मोठय़ा संख्येने येणारे कार्यकर्ते आणि वाहने यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे. हे पाहता सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनांसाठी नियमावली आखून देण्यात आली आहे. मुलुंड पूर्वेकडील आनंद नगर चेक नाका, मुलुंड पश्चिमेकडील मॉडेला चेक नाका, ऐरोली चेक नाका आणि वाशी चेक नाक्यांवर अवजड आणि मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासाठी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण आणि नवी मुंबई पोलिसांनी अवजड आणि मालवाहतूक वाहनचालकांना अन्य मार्गाचा वापर करण्याची सूचना करण्यास सांगण्यात आले आहे. सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, एलबीएस रोडवरील सुर्वे जंक्शन, सायन जंक्शन, धारावी टी-जंक्शन, हंसभुग्रा मार्ग, सीएसटी रोड, नेहरू रोड, शारदादेवी रोडवरील प्रवास टाळा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पूर्व उपनगरातील जेव्हीएलआर, एलबीएस रोड आणि ईस्टर्न फ्री वे तर पश्चिम उपनगरातील एस. व्ही. रोड लिकिंग रोड वाहनचालकांसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि प्रवाशांनी त्याप्रमाणे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

बेस्टच्या १७० जादा बसगाडय़ा
भाजपने राज्यासह अन्य भागातून मुंबईत येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी लांब पल्ल्याच्या २८ गाडय़ा आरक्षित केल्या आहेत. या गाडय़ांमधून मुंबईत दाखल होताच वांद्रे-कुर्ला संकुलात येण्यासाठी कार्यकर्त्यांना खासगी बस आणि बेस्ट बसचाही पर्याय दिला आहे. बेस्टकडून १७० बस गाडय़ा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2018 3:14 am

Web Title: bjp rally in mumbai mmrda bkc traffic changes from mumbai police
टॅग : Bjp
Next Stories
1 भाजपाने लाखो रुपये खर्च केलेल्या रेल्वेच्या विशेष गाडीत केवळ १७ प्रवासी
2 स्वच्छतेच्या नियमांचा भाजपकडून बोजवारा
3 कोकणातील हापूस सामान्यांना ‘आंबटच’!
Just Now!
X