मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपला मोठा फटका बसला. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या के लेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार पिछाडीवर होते. धुळे-नंदुरबारच्या पोटनिवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल यांनी विजय प्राप्त के ला.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चार मतदारसंघांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. धुळे-नंदूरबारमध्ये भाजपने विजय संपादन के ला. तर अमरावतीमध्ये अपक्ष आघाडीवर होता.

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे संदीप जोशी हे पहिल्या फे रीअखेर पिछाडीवर होते. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी १२,६१७ तर भाजपचे संदीप जोशी यांना ७,७६७ मते मिळाली. नागपूर पदवीधर हा पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अमरावतीत शिक्षक मतदारसंघात पहिल्या फेरीत अपक्ष (शिक्षक संघ)  उमेदवार किरण सरनाईक यांनी  शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यापेक्षा ८३१ मते अधिक घेतली होती.

 पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड हे सुमारे १० हजार मतांनी आघाडीवर होते. भाजपचे संग्राम देशमुख हे दुसऱ्या क्र मांकावर होते. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आजगावकर हे आघाडीवर होते.

औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण हे सुमारे १६ हजार मतांनी आघाडीवर होते.