News Flash

पंकजा यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने पंकजा मुंडे व त्यांचे समर्थक नाराज होते.

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने पंकजा मुंडे व त्यांचे समर्थक नाराज होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेच माझे नेते असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे सांगून देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख टाळला होता व धर्मयुद्ध टाळत असल्याचे सांगून आपली नाराजीही व्यक्त केली होती. या पाश्र्वाभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या वरळी कार्यालयात मंगळवारी भेट घेतली होती. पंकजा मुंडे नाराज नसल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 1:27 am

Web Title: bjp state president chandrakant patil national secretary pankaja munde mp pritam munde akp 94
Next Stories
1 खंडणीप्रकरणी परमबीर यांच्यासह ८ जणांवर गुन्हा
2 सुरेंद्र गडलिंग यांची तात्पुरत्या जामिनाची मागणी
3 ऑनलाइन तासिका सुरू न करणाऱ्या महाविद्यालयावर कारवाईची मागणी
Just Now!
X