News Flash

वाराला प्रतिवार करणे ही तर शिवाजी महाराजांची शिकवण

मी त्यांना काही बोललो नव्हतो, परंतु त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार व चंद्रकांत पाटील संग्रहित छायाचित्र

चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची यादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून चोरून राज्यपालांना सादर केल्याचा मुद्दा उपस्थित केला. वाराला प्रतिवार करणे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर करण्याचा विषय चौदा महिन्यांचा जुना आहे, आता का काढता, असा सवाल अजित पवार यांनी केला. त्याविषयी पाटील म्हणाले की, महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवार यांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती. मी त्यांना काही बोललो नव्हतो, परंतु त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. आता चौदा महिने झाले, तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. पवारांची कृती कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 3:06 am

Web Title: bjp state president chandrakant patil slams deputy chief minister ajit pawar zws 70
Next Stories
1 हँकॉक पूल नोव्हेंबरपासून खुला?
2 नियमभंग खपवून घेणार नाही!
3 मुंबईत ७९४ नवे रुग्ण; २० बाधितांचा मृत्यू
Just Now!
X