मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर शुक्रवारी एक व्यंगचित्र पोस्ट केले होते. या व्यंगचित्रात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीवर भाष्य करण्यात आले होते. तेच व्यंगचित्र भाजपा समर्थकाने वापरून अमित शाह यांच्या जागी शरद पवार तर उद्धव ठाकरे यांच्या जागी राज ठाकरे यांना दाखवले आहे. सत्तेसाठी मन की बात असाच या व्यंगचित्राचा मथळा ठेवण्यात आला आहे. शरद पवार आणि राज ठाकरे एकमेकांची भेट घेत आहेत आणि दोघांच्याही दुसऱ्या हाती खंजीर आहे असेच या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ या फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. त्यांचेच व्यंगचित्र त्यांच्याच गळ्यात असा मथळा देऊन हे व्यंगचित्र या पेजवर पोस्ट करण्यात आले आहे.

vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या आक्रमक भाषणाच्या शैलीसाठी जितके प्रसिद्ध आहेत तितकेच त्यांच्या व्यंगचित्रांसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांचे नवे व्यंगचित्र ही बातमी ठरतेच. मात्र शुक्रवारी काढलेल्या व्यंगचित्राला भाजपा समर्थकांनी उत्तर दिले आहे त्यावरूनच भाजपाला राज ठाकरेंनी काढलेले व्यंगचित्र फारसे रुचले नसावे असेच दिसून येते आहे. पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ हे अधिकृत फेसबुक पेज नाही. मात्र या पेजचा उद्देश भाजपाला समर्थन देणे हाच आहे त्यामुळे या पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा प्रयत्न या पोस्टमधून करण्यात आला आहे. यावर राज ठाकरेंचे काही वक्तव्य समोर येते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची गळाभेट दाखवण्यात आली होती. तर एकीकडे दोघे भेटत असताना दोघांच्याही दुसऱ्या हातात खंजीर आहे असेही त्या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी दाखवले होते. याच व्यंगचित्राचा वापर त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपा समर्थकाने केलाय. हे व्यंगचित्रही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते आहे.