News Flash

मराठा आरक्षण आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

आंदोलनात पक्षाचा झेंडा किंवा नाव असणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

मुंबई : मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून पक्षाचे नेते व कार्यकर्ते त्यात  सहभागी होतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे केली. मराठा आरक्षणासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजपच्या समितीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आमदार आशीष शेलार, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा समावेश

आहे. समितीची पहिली बैठक रविवारी मुंबईत झाली.  सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द ठरविल्यानंतर मराठा समाजाला एकटे पडल्यासारखे वाटत आहे.  पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजातील विविध संघटना जे आंदोलन करतील, त्यामध्ये भाजप सहभागी होईल. आंदोलनात पक्षाचा झेंडा किंवा नाव असणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 2:39 am

Web Title: bjp to support agitation for maratha reservation zws 70
Next Stories
1 Coronavirus : मुंबईत दिवसभरात १,५४४ रुग्ण, ६० जणांचा मृत्यू
2 टाटा मेमोरियल रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या १०० सदनिकांचा ताबा
3 लसीकरण आजही बंद
Just Now!
X