मुंबई महापालिकेत आता भाजपा विरोधी बाकांवर बसणार असल्याचंही आमदार राम कदम यांनी जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर २०२२ ला मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर बसणार असं वक्तव्य भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलं आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत असलेली शिवसेना आणि भाजपाची युती संपुष्टात आली आहे. मुंबई महापालिकेत भाजपाचे ८३ नगरसेवक आहेत. तर अपक्षांसह शिवसेनेकडे ९४ नगरसेवकांचं बळ आहे. काँग्रेसचे २९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवक आहेत.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला मुंबई महापालिकेत राबवण्यात आला तर महाविकास आघाडीकडे १३२ नगरसेवकांचं बळ असेल. अशात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपा भूमिका निभावणार आहे असं राम कदम यांनी जाहीर केलं आहे.