भाजपची संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असून २० नोव्हेंबर ते डिसेंबर अखेपर्यंत मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि सर्वात शेवटी प्रदेशाध्यक्ष अशा रीतीने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होईल, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्र, हरयाणासह काही प्रमुख राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आणि संघटनात्मक निवडीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. जानेवारी २०२० मध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होणार असून त्यामुळे डिसेंबरअखेपर्यंत प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. राज्यात ९३ हजारांपेक्षा जास्त बूथ असून बूथप्रमुख पातळीपर्यंत संघटनात्मक रचना भाजपने तयार केली आहे.

भाजपच्या प्रमुख नेत्यांची, संघटनेतील पदाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. त्यात भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांबाबत चर्चा झाली.