22 September 2020

News Flash

वीज नियामक आयोगापुढे भाजपची याचिका

वीजबिले भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत, वीज दरवाढीस स्थगिती, १०० युनिटपर्यंत वीज मोफत आदी मागण्या

संग्रहित छायाचित्र

टाळेबंदी काळातील वीजबिले भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदत, वीज दरवाढीस स्थगिती, १०० युनिटपर्यंत वीज मोफत आदी मागण्या करणारी याचिका भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी राज्य वीज नियामक आयोगापुढे सादर केली आहे.

करोना काळातील टाळेबंदीमुळे उद्योग-व्यवसाय अडचणीत असून अनेकांच्या नोकऱ्यांचेही प्रश्न आहेत. नागरिकांच्या उत्पन्नाला फटका बसला असून त्यांना भरमसाट वीजबिले पाठविण्यात आली आहेत. ती न, भरल्यास वीज जोडण्या खंडित करण्याच्या धमक्या वीज कंपन्यांकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे वीजबिलांची पुन्हा तपासणी करून ती भरण्यास सहा महिने मुदत मिळावी, ३०० युनिट्सपर्यंतही ५० टक्के दरसवलत मिळावी, यासह अन्य मागण्या आयोगापुढे करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:01 am

Web Title: bjps petition before the electricity regulatory commission abn 97
Next Stories
1 अतिरिक्त पाच लाख मेट्रिक टन युरियाची केंद्राकडे मागणी -भुसे
2 परदेशी विद्यापीठांना आता भारतात प्रवेश
3 सुशांत सिंह आत्महत्या: बिहार पोलिसांकडून अंकिता लोखंडेची चौकशी
Just Now!
X