03 December 2020

News Flash

सलमानच्या सुटकेसाठी कतरिनाचं सिद्धिविनायकाला साकडं

जोधपूर कोर्टात आज काळवीट प्रकरणाची अंतिम सुनावणी

कतरिना आणि सलमानची बहिण अर्पिता मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले होते.

राजस्थानमधील जोधपूर कोर्टात आज काळवीट प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे. अभिनेता सलमान खानला तुरुंगाची हवा खावी लागणार की नाही याचा फैसला आज होणार आहे. जर यात सलमान दोषी आढळला तर त्याला जास्तीत जास्त ६ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. या प्रकरणातून सलमाननं निर्दोष सुटावं यासाठी कतरिनानं सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं घातलं आहे.

कतरिना आणि सलमानची बहिण अर्पिता मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले होते. काळवीट शिकार प्रकरणी सलमानची सुटका व्हावी यासाठी कतरिना मंदिरात गेली असल्याचं म्हटलं जातंय. सोबत सलमानची बहिण असल्यानं हेच प्रमुख कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात सलमानसोबतच अभिनेता सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम या अभिनेत्रींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जोधपूरनजीकच्या कनकनी खेड्यातील भगोडा की धानी येथे दोन काळवीटांची शिकार केल्याचा सलमान खानवर आरोप आहे. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे आज न्यायालय काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 9:49 am

Web Title: black buck poaching case salman khan verdict katrina kaif and arpita visti siddhivinayak temple
टॅग Salman Khan
Next Stories
1 पाकच्या सैन्याने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवावं, आफ्रिदीला जावेद अख्तर यांचं चोख उत्तर
2 सलमानच्या भेटीऐवजी बालसुधारगृहात रवानगी
3 अभिनेत्री किम शर्मा अडचणीत
Just Now!
X