News Flash

गुगलच्या होमपेजवर अब्दुल कलामांना श्रद्धांजली

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना गुरूवारी गुगलकडून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

| July 30, 2015 11:51 am

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना गुरूवारी गुगलकडून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. गुगलच्या होमपेजवर गुरूवारी सकाळपासून एक काळी फीत लावलेली पहायला मिळत आहे. माऊसचा कर्सर या फितीजवळ नेल्यास ‘इन मेमरी ऑफ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम’ असा संदेश पहायला मिळत आहे. कलाम यांच्यावर आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर कलाम यांना गुगलने श्रद्धांजली वाहिली आहे. गुगलकडून अनेक गोष्टींचे औचित्य साधून होमपेजवर करण्यात येणाऱ्या सर्जनात्मक सादरीकरणाला नेहमीच इंटरनेट युजर्सकडून पसंती दिली जाते. भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रात कलाम यांनी दिलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण योगदानामुळे ते जगभरात ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच कलाम यांच्या निधनानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शोक व्यक्त करण्यात आला होता. शिलाँग येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेण्ट’मध्ये सोमवारी डॉ. कलाम यांचे व्याख्यान होते. त्यासाठी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तेथे आल्यानंतर त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी त्यांच्या व्याख्यानास प्रारंभ झाला आणि काही वेळातच ते जागीच कोसळले. साधारण सातच्या सुमारास त्यांना बेथनी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. मात्र, पावणेआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 11:51 am

Web Title: black ribbon tribute for former president apj abdul kalam from google
टॅग : Google,Internet
Next Stories
1 कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत याकुब मेमनचा मुंबईत दफनविधी
2 प्रत्येक विभागात १० कामे करण्याचे बंधन
3 औषधांची जेनेरिक नावे सुवाच्च अक्षरातच हवी
Just Now!
X